
भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण! मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस…
पुणे : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रात भोंदूबाबांच्या जाचाच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या एकाने अध्यात्माच्या नावाखाली एका ३५ वर्षीय महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. “मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस,” असे वारंवार सांगून या भोंदूबाबाने महिलेला जाळ्यात अडकवले आणि नंतर तिचे लैंगिक शोषण केले. ऋषिकेश वैद्य असे या स्वयंघोषित गुरुचे नाव आहे. वसईच्या माणिकपूर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला पुण्यातील रहिवासी असून २०२३ मध्ये तिची ओळख ऋषिकेश याच्यासोबत फेसबुकवरून झाली होती. महिलेच्या धार्मिक ओढीचा फायदा घेत ऋषिकेश याने तिला अध्यात्म शिकवण्याचे आमिष दाखवले. डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला. मांजरी येथील एका लॉजवर नेऊन त्याने महिलेला गुंगीकारक पदार्थ दिला आणि बेशुद्धावस्थेत तिच्यावर बलात्कार केला. शिवाय, पीडितेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फोटोंच्या जोरावर त्याने मे २०२५ मध्ये तिला वसईतील एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
नाशिकमधील ‘खरात’ प्रकरण समोर आल्यानंतर पीडितेने हिंमत एकवटली आणि आपल्या पतीला हा सर्व प्रकार सांगितला. या भोंदूने अशाच प्रकारे अनेक युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वसईच्या माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

