
पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…
पुणे: पुणे शहराच्या विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली असता कारवाईपासून वाचण्यासाठी एका महिलेनं थेट इमारतीच्या गॅलरीतून उडी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न फसला. इमारतीवरून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
पुणे शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. सोमवारी दुपारी विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवर असलेल्या एका उच्चभ्रू इमारतीत पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी इमारतीवरून उडी मारणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तर स्पाचा मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘सिटी स्पेस’ बिल्डिंगमध्ये ‘द रुट्स स्पा’ (The Roots Spa) नावाचे स्पा सेंटर सुरू होते. स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक बनावट ग्राहक तिथे पाठवला. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या पथकाने पंचासमक्ष तिथे धाड टाकली.
पोलिसांनी छापा टाकताच स्पा सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या कारवाईला घाबरून एक महिला आणि स्पाच्या मॅनेजरने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, खाली उतरताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. यामध्ये ३० ते ३५ वयोगटातील एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही महिला मूळची पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेत स्पा मॅनेजर हुसेन शेख हा देखील खाली पडल्याने त्याचा पाय मोडला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळली होती. त्यांनी काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. आत गेल्यानंतर पोलिसांना तिथे ४ महिला आणि ४ पुरुष नको त्या अवस्थेत आढळून आले. त्या सर्वांना ताब्यात घेत असताना एका महिलेने आणि स्पाच्या मॅनेजरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पुणे! युवकाने बुधवार पेठेत जाऊन वेश्यागमन केले अन् पासवर्डच विसरला…
पुणे शहरात रात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान काय घडलं; पोलिसांचा प्रचंड फौजफाटा…
पुणे! बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा घरापर्यंत पाठलाग करायचे अन्…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

