पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…

पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेचा 6 जणांनी मिळून खून केल्याची घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली होती. संशयित अवस्थेत आढळून आलेल्या या महिलेच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे. महिलेवर बलात्कार करून तिला मांगडेवाडी येथील दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला (वय ४०) वेश्याव्यवसाय करायची. 8 फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होती. त्यावेळी आरोपी केशव कमलेश चौधरी (वय 20), सोन्या लक्ष्मण पवार (वय 18) आणि अब्दुल मोहम्मद शेख (वय 23) यांनी महिलेला पाहिले. तिघांनी महिलेला कात्रज येथील एका लॉजवर घेऊन जायचे ठरवले. मात्र लॉजवर न नेता त्यांना मांगडेवाडी येथील क्रशर खाणीजवळील डोंगरावर नेण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इतर आरोपी महादेव अर्जुन व्होरडे (वय 40), साई अमित पुजारी (वय 19) आणि सोहेल हनीफ खान (वय 20) तेथे पोहोचले.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

मृत महिला आणि आरोपी डोंगरावर मद्यपान करत असताना महिलेने आपल्याला लॉजवर न नेता डोंगरावर का आणले? असा सवाल करत आरोपींसोबत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात महिलेला मारहाण केली. त्यानंतर सुमारे 50 ते 55 फूट खोल असलेल्या खाणीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. महिलेचा या घटनेत मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

आरोपींनी सीसीटीव्हीमध्ये ओळख पटू नये यासाठी रिक्षाचे हूड बदलल्याची बाबही तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे केला. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…

पुणे! युवकाने प्रेमसंबंधातून संपवलं आयुष्य, दोन बहिणींवर गुन्हा…

पुणे! आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने पत्नीच्या वाढदिवशी घेतला जगाचा निरोप…

पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!