Valentine Day ला शिक्षकाने विद्यार्थिनीला बाहेर बोलवलं अन्…

सातारा: कराड तालुक्यातील मलकापूर शहरात एका व्यक्तीने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला त्याने वर्गाबाहेर बोलवून तिच्यासोबत विकृत कृत्य केल्याचा प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच घडला आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलकापूर शहरात व्हॅलेंटाईन डेला एका शिक्षकाने इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलवले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र, शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. तिचा हात पकडून तिला प्रपोज केला.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

“मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत शिक्षकाने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आहे. या प्रकारानंतर घाबरलेल्या मुलीने शिक्षकाचा हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबीयांना सांगितली. या प्रकारानंतर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; रात्रीच्या वेळी भेटायला बोलवायचा अन्…

सोलापूर! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; आता तु चांगली सापडली…

शिक्षकाने काढली शाळेतच विद्यार्थिनीची छेड; उसळली संतापाची लाट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!