लोणावळा! अखेर श्रेयाच्या मृत्यूचं गुढ उकललं, तपासात धक्कादायक वळण…

लोणावळा (पुणे): लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या 400 फूट खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. श्रेया नरेंद्र पटी (वय १९, रा. मुंबई) असे या युवतीचे नाव असून तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अपघात नसून ती आत्महत्या असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. मुंबईहून ट्रेकिंगचं निमित्त सांगून आलेल्या श्रेयाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचा शोध लोणावळा ग्रामीण पोलिस घेत होते.

सुरुवातीला हा घातपात किंवा अपघात असल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या धक्कादायक घटनेमागचं वास्तव आता हळूहळू समोर येत आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होती. तिच्या घरातील अंतर्गत कलह आणि कौटुंबिक वादामुळे तिची मनस्थिती ढासळली होती. याच मानसिक त्रासामुळे तिने थेट मुंबईवरून लोणावळा गाठलं आणि आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.

crime-book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

शिवदुर्ग रेस्क्यू टीम, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या सहाय्याने 390 फूट खोल दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस आता तांत्रिक पुराव्यांची वाट पाहत आहेत. श्रेयाचा मोबाईल आणि लॅपटॉप सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, मात्र ते दोन्ही डिव्हाईस लॉक असल्याने तपासात मोठे अडथळे येत आहेत. टपरीमागे एक बॅग सापडली. ती बॅग श्रेयाची होती. या उपकरणांमधील डेटा अनलॉक झाल्यानंतरच तिच्या आत्महत्येपूर्वीच्या मनस्थितीबद्दल आणि अंतिम संवादाबद्दल अधिक स्पष्टता मिळू शकणार आहे.

दरम्यान, लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तिथल्या पुराव्यांवरून ही आत्महत्या असल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत. श्रेया ही उच्चशिक्षित असूनही तिने कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी बापाने घेतला चिमुकलीचा बळी…

अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी लाखो रुपयांची चोरी; 7 चोरट्यांना अटक…

नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…

बीडच्या माजी सरपंचाचा तामिळनाडूमध्ये प्रताप; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!