शरीर संबंधासाठी हट्ट; कपडे काढत असतानाच संपवले…

छत्रपती संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट परिसरात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात खून करणाऱ्या महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेण्यात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

वंदना राजू पवार (वय ४५) व धीरज उर्फ टेमा राजू पवार (वय १९, दोघे रा. जामडी फॉरेस्ट शिवार, ता. कन्नड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाची घटना ही १३ जानेवारी रोजी उघडकीस आली. पोलिसांनी मृत व्यक्ती हा जामडी गावातील राजु रामचंद्र पवार (रा. जामडी, कन्नड) अशी ओळख पटविली. खुनाच्या घटनेनंतर आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, कन्नड ग्रामीण पोलिस, डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक पथक घटनास्थळावरून मारेकऱ्यांचा माग सूरू केला. घटनास्थळी मृताच्या अंगावरील अंडरवेअर, चप्पल व फुटलेला मोबाइल सापडला होता. जंगलाचा भाग असल्यामुळे तांत्रिक पुराव्यांचा अभाव होता. या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करण्यात आले होते. तपास करण्यासाठी ६० ते ७० संशयीताची पोलिसांनी कसून चौकशी केली. मृतदेह सापडलेल्या ठिकाणा लगतचे शेत राजू जोधा पवार यांचे असून त्याची देखभाल पत्नी वंदना व मुलगा धीरज करत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या दोघांची चौकशी सुरू केली. या दोघांच्या जबाबात विसंगती आढळली. विसंगती आढळताच वंदना पवार आणि धीरज उर्फ टेमा राजु पवार या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

वंदना पवार हिने तपासादरम्यान सांगितले कि, मृत राजू पवार वारंवार तिच्यावर अनैतिक संबंधासाठी दबाव टाकत होता. या त्रासाला कंटाळली होती. मृत राजु हा आपल्याला त्रास देत मुलाला सांगितले. यानंतर दोघांनी खून करण्याचा कट रचला. १३ जानेवारी रोजी राजू पवार याला शेताजवळ बोलावले. तो कपडे काढत असतानाच धीरजने लाकडी ओंडक्याने डोक्यावर व गुप्तांगावर वार केले. वंदनानेही मदत करत त्याचा जीव घेतला. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह वनभागातील नाल्यात झाडाच्या मुळाशी पाण्यात अडकवून ठेवण्यात आला होता.

या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पेालिसांनी वंदना पवार आणि धीरज उर्फ टेमा पवार या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना कन्नड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, सहायक अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्यासह एलसीबी व कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकारी-अंमलदारांनी केली आहे.

अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…

पुणे शहरातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंध…

नवऱ्याचे 19 महिलांशी अनैतिक संबंध, बेडरुमला स्पाय कॅमेरा लावला अन्…

बीड हादरले! अल्पवयीन मुलीच्या आईचेच निघाले जावयासोबत अनैतिक संबंध…

नवरा शारिरीक सुख देऊ शकत नव्हता अन् दीरासोबत अनैतिक संबंध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!