
पुणे! दुधवाल्याला डिजिटल लॉकचा अचुक पासवर्ड समजला अन् मारला डल्ला…
पुणे: विमाननगर परिसरात प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात घरात नियमितपणे दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दुधवाल्यानेच चोरी केल्याचे उघड झाले आहे. व्यंकटेश करंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी विमाननगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
रामेश्वरम् कॅफेच्या मालकाच्या घराला डिजिटल लॉक बसवण्यात आले आहे. आरोपी व्यंकटेश करंडे हा गेल्या अनेक दिवसांपासून या घरावर पाळत ठेवून होता. घरात दूध टाकण्यासाठी येताना तो वारंवार डिजिटल लॉकचा पासवर्ड टाकून पाहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र प्रत्येकवेळी त्याचा प्रयत्न फसत होता. अखेर 17 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास आरोपीला डिजिटल लॉकचा अचूक पासवर्ड समजला. त्यानंतर त्याने घरात प्रवेश करून कपाटातील 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड लंपास केली. चोरीनंतर तो तेथून पसार झाला. दरम्यान, घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली होती.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून विमाननगर पोलिसांनी त्याला अटक केली. घरात विश्वासाने येणाऱ्या व्यक्तीकडूनच चोरी झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याप्रकरणी विमाननगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुण्याच्या सायकल स्पर्धेदरम्यान 50 सायकलस्वार एकमेकांवर आदळले…
पुणे! युवतीला हॉटेल रेटिंगचे सोपे ‘टास्क’ पडले महागात…
पुणे! मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली; बियर अन् सिगारेटची पार्टी केली अन् 4 तास हत्येचा थरार…
पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…

