बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी; तलवारी, कोयते, लोखंडी रॉड अन्…

बारामती: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीकडून पोलिसांनी तब्बल 12 लाख 95 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी या टोळीकडून लहान-मोठ्या अशा 32 शेळ्या आणि बोकड जप्त करून चोरी झालेल्या शेतकऱ्यांना वाटप केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वडगाव निंबाळकर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून अशोक बाबुराव जाधव याला अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत. अशोक बाबुराव जाधव यांच्यावर वडगाव निंबाळकर लोणंद आणि हडपसर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे देखील दाखल आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पिक अप गाडी मधून 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड, 1 स्क्रू ड्रायव्हर, 1 तार कटर, 1 चाकू, 1 लाकडी काठी, 1 प्लॅस्टीक पाईप आदी साहित्य जप्त केले आहे. सदर टोळी कडून आणखीन मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता वडगाव निंबाळकर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

सदोबाचीवाडी (ता. बारामती) येथील इनामवस्तीवरील संजय जगन्नाथ होळकर या शेतकऱ्याचे चार बोकड आणि एक शेळी चोरीला गेली होती. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तिघांना पकडण्यात यश आले आहे. अजय सतीश होळकर (रा. होळ), आर्यन सचिन माने (रा. सदोबाचीवाडी), बंटी नंदकुमार घोडके (रा. वडगाव निंबाळकर) अशी आरोपींची नावे आहेत. तिघांनाही सोमवारी बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्यांच्याकडून आणखी तपास करत आहोत, ही माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.

आरोपींनी संजय होळकर यांच्या गुरांच्या गोठ्यात शिरून लोखंडी जाळी तोडून चार बोकड आणि एक शेळी दोन दुचाकी वापरून चोरी केल्या होत्या. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि सीसीटीव्हीच्या माहितीचे विश्लेषण करून सदर आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चारही बोकड व एक शेळी हस्तगत केली. तसेच चोरीसाठी वापरलेल्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलीस हवालदार पोपट नाळे अधिक तपास करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोपट नाळे, सागर चौधरी, हृदयनाथ देवकर, महेश पन्हाळे, भाऊसाहेब मारकड, आबा जाधव, सूरज धोत्रे, विलास ओमासे या पथकाने ही कामगिरी केली.

वाघळवाडी येथूनही रविवारी पहाटेच्या दरम्यान एक पिकअप घेऊन आलेल्या तीन- चार चोरट्यांनी कांताबापू गायकवाड यांच्या गोठ्यातील चार शेळ्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला. शेळ्यांच्या आवाजाने शेतकरी जागा झाला. तोपर्यंत चोरट्यांनी तीन शेळ्या गायब केल्या, मात्र एक शेळी बचावली. याबाबतचा तपास अंतिम टप्प्यात असल्याचे नागनाथ पाटील यांनी सांगितले.

पुणे! मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली; बियर अन् सिगारेटची पार्टी केली अन् 4 तास हत्येचा थरार…

पुणे जिल्ह्यातील जगदंबा हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 10 कर्मचारी भाजले…

पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दरोडेखोरांचे आव्हान स्विकारले अन्…

पुणे जिल्ह्यातील प्राध्यापकाच्या चपला विहिरीच्या काठावर दिसल्या अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!