पुणे! गजा मारणे टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे: कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याच्या टोळीमधील रूपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी मुळशीतील आंदगाव तालुक्यातून अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रूपेश मारणे हा फरार होता.

पुणे शहरातील कोथरुड भागात 19 फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. देवेंद्र जोग हे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळील व्यक्ती असून, त्यांनी या प्रकरणामध्ये वैयक्तिक लक्ष घातले होते. त्यानंतर गजा मारणेला अटक केली गेली होती. यानंतर गजानन मारणे टोळीतील गुंड रूपेश मारणे याला अटक करण्यात आली आहे. रूपेश मारणे हा गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. अखेर रुपेश सोमवारी रात्री मुळशीतील आंदगावमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुंड गजानन मारणे याच्यासह रूपेश मारणे याच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल होता. मात्र तेव्हापासून रूपेश मारणे हा पोलिसांना चकवा देत फरार होता. गजानन मारणेनंतर रुपेश टोळीची सुत्र चालवत होता, अशी माहिती देखील पोलिसांना मिळाली होती. पुणे पोलिसांनी रुपेश मारणे याला अटक झाल्यानंतर अनेक मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

गुंड गजा मारणे याला ‘मटण पार्टी’ नंतर दुसरा ‘जोर का झटका’…

गुंड गजा मारणे मटण पार्टी प्रकरणी मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

कुख्यात गुंड गजा मारणेची ‘मटण पार्टी’ पडली महागात; पोलिस निलंबीत…

कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर…

गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्‍याला बेदम मारहाण…

पुण्यातील गुंड गजा मारणे याला रिल्स बनवणं पडलं महागात…

रांजणगाव देवस्थानमध्ये विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गुंड गजानन मारणेचा सत्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!