
पुणे! सारसबागेत दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी…
पुणे: पुणे शहरातील सारसबाग दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमादरम्यान धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये आज (बुधवार) वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. मात्र, सारस बागेत तैनात असलेल्या कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत हा वाद मिटवला. ही घटना वगळता सारसबाग येथील पाडवा पहाट कार्यक्रमात अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
सारसबागमध्ये पाडवा पहाटच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. शिवाय, सारसबाग मध्ये असलेल्या तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून गर्दी झाली होती. गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेत पाडवा पहाटेचा हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, यंदा सारसबागेत होणाऱ्या या पाडवा पहाट कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या धमक्यांना कंटाळून आयोजकांनी पाडवा पहाटेचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुणे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर आयोजकांनी हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासून सारसबागेच्या परिसरात कडेकोड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याचे आश्वासन दिल्यानंतर आयोजकांकडून कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. सारसबागेच्या बाहेर पोलिस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. एकमेकांना धक्का लागल्याने दोन गटात हाणामारी झाली. मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रकरण मिटवले. चार ते पाच जणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे! दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पोलिसांनी उतरवला माज…
पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या गँगवर आणखी मोठी कारवाई…
पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य…
पुणे! स्वारगेट पोलिसांनी सोन्याची बांगडी चोरणाऱ्यास केले जेरबंद…
पुणे! NDA मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

