रायगडमध्ये FB मित्राने घात केला ठेवले शरीरसंबंध अन्…

रायगड : महाड तालुक्यातील एका महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात पडली आहे. FB मित्राने मागील अडीच वर्षांपासून विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, तिची ३८ वर्षीय आरोपीसोबत फेसबुकद्वारे ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. शिवाय, शारीरिक संबंधांचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले, तसेच तिचे फोटोही काढले. या छायाचित्रांचा आणि व्हिडीओचा वापर करून आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेनं निमूटपणे आरोपीचे अत्याचार सहन केले.

गेल्या अडीच वर्षांच्या काळात आरोपीने पीडितेच्या गोरेगाव येथील राहत्या घरी आणि मुंबईतील विक्रोळी येथील स्वतःच्या निवासस्थानीही तिच्यावर अत्याचार केले. मानसिक आणि शारीरिक यातना सहन अडीच वर्ष तणावाखाली घालवली अखेर महिलेने हिंमत दाखवून महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विवाहित महिलेशी प्रेमसंबंध अन् आत्महत्या; पाहा WhatsApp स्टेटस मेसेज…

प्रेमसंबंधाच्या चर्चेला उधाण! पोलिस अधिकाऱ्यासोबत बायकोला रंगहात पकडले अन्…

नवऱ्याचे 19 महिलांशी अनैतिक संबंध, बेडरुमला स्पाय कॅमेरा लावला अन्…

युवकासोबत ठरला 500 रुपयांत शरीरसंबंधचा सौदा अन् केलं कांड…

महाराष्ट्र हादरला! अधिकाऱ्याने केली महिला डॉक्टरकडे शरिरसंबंधाची मागणी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!