युवकाने नवविवाहित पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला धक्का…

नाशिक: युवतीने आपल्या मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केल्यानंतर युवकासोबत लग्न करत त्याची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. युवतीसह तिच्या आई-वडिलांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

युवकाला लग्नानंतर पत्नीच्या वागण्यात विचित्रपणा जाणवू लागला. पत्नीच्या अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे. युवकाने पत्नीचा मोबाइल तपासला असता अश्लील व्हिडिओ आणि फोटोने त्याला मोठा धक्का बसला आहे. युवतीच्या वडिलांना फसवणूक का केली अशी विचारणा केली असता त्यांनी युवकालाच धमकी देत शिवीगाळ केली. नाशिक पोलीसंकडून घटनेचा तपास सुरू, प्रकरणातील पती पत्नी उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

सामनगाव रोड, सिन्नर फाटा येथील रहिवासी युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘त्याचा विवाह एका तरुणीसोबत झाला होता. मात्र, तिच्या वागण्यात विचित्रपणा जाणवू लागला होता. तिला अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत होती. लग्नानंतर संबंधित तरुणी सतत फोनवर बोलत असे, तसेच व्हिडीओ कॉल आणि चॅटिंग करत असल्याचे समोर आले आहे. ‘एमकॉम’च्या परीक्षेसाठी ती माहेरी गेली असता, लग्नावेळी मिळालेलं तीन तोळ्यांचं सोन्याचं गंठण हरवल्याची माहिती तिने पतीला दिली होती. माहेरून परतल्यानंतर युवकाने तिचा मोबाईल तपासला असता, तिच्या समलैंगिक विवाहाबाबतची माहिती मिळाल्याने धक्काच बसला. या संदर्भात युवकाने तिच्या वडिलांना प्रश्न विचारले असता, त्यांनी उलट तरुणालाच शिवीगाळ करून धमकावल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार मोरे पुढील तपास करत आहेत.

युवतीने तिच्या मैत्रिणीसोबत केलेले अश्लील चॅट, बाथरुममध्ये एकमेकींना विवस्त्र अवस्थेत केलेले व्हिडीओ कॉल, एकमेकींचे शारीरिक संबंधांचे व्हिडीओ, त्यात तरुणीने पती तरुणाचा कसा गेम करते बघ, ही सर्व माहिती त्याला तिचा फोन चेक केल्यानंतर समजली. पत्नीच्या आईनेदेखील सुरुवातीला या प्रकाराबाबत नकार दिला. परंतु, खुद्द तरुणीनेच मैत्रिणीसोबत आपण समलैंगिक विवाह केल्याचे आणि पुरुषांबाबत आपल्याला आकर्षण नसल्याचे आणि याबाबत आई-वडिलांना सांगितले होती अशी माहिती दिली. मात्र, त्यांनी आपलं लग्न बळजबरीने फिर्यादी तरुणाशी लावून दिले. तसेच हा विवाह होऊ नये म्हणून आपण घर सोडल्याचे, विषारी गोळ्या सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याने तिच्या आईचेही बिंग फुटले. तिला सिगारेट, हुक्क्याचे व्यसन असल्याचेही यातून उघड झाले आहे.

नाशिक! अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करताच बसला धक्का; नराधम निघाला…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

भोंदूबाबा व्यापाऱ्याला बंद खोलीत घेऊन गेले अन् शुद्धीवर आल्यावर बसला धक्का…

नवरीचा बेडवर सापडला प्रियकराचा मोबाईल; ओपन करताच बसला धक्का…

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!