महाराष्ट्र हादरला! अधिकाऱ्याने केली महिला डॉक्टरकडे शरिरसंबंधाची मागणी…

जळगाव: जळगाव महानगरपालिकेत एका महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित महिला डॉक्टरने महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पीडित महिलेने थेट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घोलपला अटक केली. या घटनेमुळे महापालिकेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पीडित महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. विजय घोलप वारंवार तिच्या केबिनमध्ये येऊन अश्लील टिप्पण्या करत होता. इतकेच नव्हे, तर त्याने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावून शरीरसुखाची मागणी केली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिला डॉक्टरने महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतरही हा छळ थांबला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने तक्रार मागे घ्यावी यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव आणला जात होता. काही व्यक्तींना तिच्या घरी आणि तिच्या पतीच्या कार्यालयात पाठवून धमक्या दिल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय, तक्रार निवारण समितीची सदस्य असल्याचे भासवून एका महिलेनेही तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला खोटी असल्याचे नंतर उघड झाले.

या सर्व गंभीर आरोपांनंतर शहर पोलिसांनी डॉ. विजय घोलप विरुद्ध विनयभंगासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या गंभीर घटनेमुळे महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, महापालिकेच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रुग्णालयाच्या वॉशरुममध्ये नर्सचा आढळला संशयास्पद मृतदेह…

बीड हादरले! अल्पवयीन मुलीच्या आईचेच निघाले जावयासोबत अनैतिक संबंध…

नगरमध्ये 4 सख्ख्या बहि‍णींवर नातलगाने केला लैंगिक अत्याचार…

नाशिक! नवविवाहित पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्याचे अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न…

पुणे! युवकाने बुधवार पेठेत जाऊन वेश्यागमन केले अन् पासवर्डच विसरला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!