
आई स्वप्नात येऊन म्हणाली, ‘तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये…
सोलापूर: जुळे सोलापूर येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवशरण तळकोटी (वय १६) असे आत्महत्या केलेल्या अकरावीत शिकणाऱ्या युवकाचे नाव आहे. तीन महिन्यापूर्वी त्याच्या आईचे कावीळ झाल्यामुळे निधन झाले होते. शिवशरण याने आत्महत्या करण्यापूर्वी भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
शिवशरण तळकोटी याने आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवशरण याने चिठ्ठी लिहीले आहे की, ‘मी शिवशरण. मी मरत आहे…कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते पण मी मामा व आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे.. आई काल स्वप्नात आली होती. ‘तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये..’ असे म्हणून तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे व आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले. मामा…. मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस.’
दरम्यान, शिवशरण तळकोटी याच्या आईचे तीन महिन्यापूर्वी कावीळ झाल्यामुळे निधन झाले होते. शिवशरण याला आईच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला होता. शिवशरण आईच्या मृत्यूनंतर त्याच्या मामाकडे राहात होता, त्यानंतर त्याने आता टोकाचं पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…
सोलापूर! मुलाचे गावातील महिलेसोबत प्रेमसंबंध; आईने केला विरोध अन्…
सोलापूरमध्ये युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या; गरम सळईने दिले चटके…
धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…
सोलापूरच्या प्रियकराने प्रेयसीचे मुंडकं कापून फेकले नदीत…

