
पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…
पुणे: पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. ते पुणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते.
राजेंद्र गायकवाड यांना शनिवारी (ता. १९) साप्ताहिक सुट्टी असल्याने ते घरीच होते. त्यांच्या पत्नी दौंड येथे गेल्या होत्या, तर १२ व १४ वर्षांची मुले शाळेत होती. दुपारी पत्नीने अनेक वेळा फोन केला. मात्र प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, शाळा सुटल्यावर मुले घरी परतली तेव्हा घर बंद होते. त्यांनी ही माहिती शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. विमानतळ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडताच घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत गायकवाड आढळून आले.
राजेंद्र गायकवाड यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. राजेंद्र गायकवाड यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या…
मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…
लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…
पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…
नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…

