सातारा हादरला! विवाहित महिलेची हत्या प्रेमसंबंधातून; आरोपीला अटक…

सातारा: सातारा जिल्ह्यातील शिवथर गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेची तिच्याच घरी गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा जाधव (वय २५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रेमसंबंधातून आरोपीने महिलेच्या घरात शिरत हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी अवघ्या 12 तासात तपासाची चक्रे फिरवत आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. अक्षय रामचंद्र साबळे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी चौकशी केली असता हा सर्व प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असल्याचे आरोपीने कबुली दिली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अक्षय साबळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा हादरला! घरामध्ये घुसून विवाहित महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या…

शिवथर गावात महिलेची सोमवारी (ता. ७) दुपारी राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात प्रेमसंबंधाचा धागा उघड झाला आहे. पूजा जाधव यांचा खून करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 12 तासांत पुण्यातून अटक केली आहे. पूजा जाधव घरी एकटी असताना आरोपी अक्षय रामचंद्र साबळे (वय 28, रा. शिवथर) तिच्या घरी गेला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर अक्षयने धारदार शस्त्राने पूजाचा गळा चिरून खून केला. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.

या प्रकरणाचा तपास सातारा तालुका पोलिसांनी वेगाने सुरू केला. स्थानिक माहिती, तांत्रिक तपशील आणि फोन लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. रात्री उशिरा पुण्यातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा जाधव हिचे अक्षय साबळे याच्यासोबत गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. याच तणावातून वाद विकोपाला गेला आणि त्याचा शेवट खुनात झाला. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अक्षय साबळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी…

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या…

जीवन संपवलं! ‘वेळेवर पैसे देता येत नसतील तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड…

सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…

सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…

सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!