अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…

मुंबई: मुंबईच्या कांदिवली परिसरात राहात असलेल्या एका अभिनेत्रीच्या मुलाने ५७व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

अभिनेत्री आपला पती आणि मुलासह मुंबईतल्या कांदिवली परिसरातील एका सोसायटीत ५७व्या मजल्यावर वास्तव्यास आहे. बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेत्रीने 14 वर्षीय मुलास ट्यूशनला जाण्यास सांगितले होते. पण मुलाला ट्यूशनला जायचे नव्हते. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे मुलगा संतापला आणि रागाच्या भरात ५७व्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलगा हा अभिनेत्रीचा एकुलता एक मुलगा होता.

दरम्यान, संबंधित अभिनेत्री कोण आहे? मुलाचं नाव काय? याबाबत पोलिसांकडून माहिती मिळू शकली नाही. तपासाबाबत पोलिस कमालीची गुप्तता पाळत आहेत. ज्या अभिनेत्रीच्या मुलाने आत्महत्या केलीय, ती अभिनेत्री गुजराती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अभिनेत्रीच्या मुलाने अशाप्रकारे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु, या मुलाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, त्याला 57 व्या मजल्यावरुन उडी टाकताना कोणी बघितले की नाही, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे आता पोलिस तपासात आणखी कोणती नवी माहिती समोर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…

अभिनेता तुषार घाडीगावकार याने काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

अभिनेता सलमान खान याच्या घरात मध्यरात्री युवतीने केला घुसण्याचा प्रयत्न; युवती कोण पाहा…

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHWARII💅 (@ishwariii16)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!