
शिक्षकाने काढली शाळेतच विद्यार्थिनीची छेड; उसळली संतापाची लाट…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका शाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नसीर मुल्ला असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
शिक्षकाने छेड काढल्याची माहिती समजताच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेवर धडक दिली. त्यांनी संतप्त होत शिक्षकाला शाळेच्या आवारातच चोप दिला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार हसन मुश्रीफ यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी संबंधित शिक्षकाला तत्काळ अटक करा, असे आदेश दिले आहेत. यानंतर स्थानिक प्रशासनानेही तातडीने हालचाल करत शिक्षक नसीर मुल्ला याचे निलंबन केले आहे.
दरम्यान, पोलिस याबाबतचा पुढील तपास करत आहेत. शाळेतील इतर विद्यार्थ्यांकडूनही घटनेची माहिती घेत आहेत. बालकांचे संरक्षण आणि शाळेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पालकांनी शाळा प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
बीडच्या क्लासमध्ये मुलीचं लैंगिक शोषण; केबिनमध्ये बोलावायचे अन् नको ते…
धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…
शिक्षक नवरा नवविवाहीत पत्नीला हसायला सांगायचा अन् फोटो काढायचा…
शाळेत सुटला संयम! शिक्षिकेला मारली पाठीमागून मिठी अन् म्हणाला…
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…

