
युवकाला वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर बोलावले अन् जागेवरच संपवले…
पालघर : वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई येथे घडली आहे. युवकाला वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आकाश पवार (वय ३०) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. मनीष पांडे (वय ३७) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने आकाशची हत्या करून, भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मित्रावर देखील जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मित्र जखमी झाला आहे. आरोपी पांडे सराईत गुन्हेगार आहे. त्याने आकाशला वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर बोलावून हत्या केली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आकाश आणि त्याचे काही मित्र रविवारी रात्री उशिरा वसई उमेलमान फाटा येथील एमआयडीसी मैदानात मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करीत होते. यावेळी आरोपी मनीष पांडे आला. त्याने आकाशला बाजूला बोलावून घेतले. आकाश वाढदिवसाच्या पार्टीतून बाजुला गेल्यानंतर मनीषने सोबत आणलेल्या धारदार चाकूने आकाशवर सपासप वार केले.
घटनास्थळी आरडाओरडा झाल्यानंतर पार्टीतील एक मित्र वाद सोडवण्यास गेला. यावेळी आरोपीने त्याच्यावरही चाकूने वार केले. या हल्ल्यात आकाशचा मृत्यू झाला असून, दुसरा युवक राहुल भुरकुंड जखमी झाला आहे. आकाशने केलेल्या प्रतिहल्ल्यात आरोपीदेखील जखमी झाला आहे. या प्रकरणी वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
View this post on Instagram
महिला कॉन्स्टेबलने बेफामपणे ट्रीपलसीट जाणाऱ्या युवतींना पकडले अन् सुनावले…
पुणे! युवकाने डिप्रेशनच्या कारणातून केला आयुष्याचा शेवट; ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले…
मुख्याध्यापक बापाने नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने मुलीचा घेतला बळी…
संतापजनक! प्रेयसीच्या चिमुकलीवर अत्याचार; गुप्तांगात टाकला स्क्रू ड्रायव्हर अन्…
महाविद्यालयीन युवती संध्या पाठक हिच्या आत्महत्येचं खरं कारण समोर…

