
पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ! इंदापूरचा पोलिस कर्मचारी चिठ्ठी लिहून बेपत्ता…
इंदापूर : पुणे ग्रामीण पोलिस दलातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या इंदापूर शहरातील पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या विष्णू केमदारने या पोलिस कर्मचार्याने अचानक काही न सांगता केवळ एक चिठ्ठी घरात ठेवत बेपत्ता झाले आहेत. या संदर्भात त्यांच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदवलेली आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
इंदापूर पोलिस स्टेशनच्या शासकीय वसाहतीत राहणारे पोलिस कर्मचारी विष्णू केमदारने (वय 39, मूळ रा. कंदर, ता. करमाळा) हे 9 जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास काहीही घरी न सांगता बेपत्ता झाले आहे. शहर परिसरात त्यांची पत्नी प्रियंका यांनी आपल्या पतीची शोधा शोध केली. मात्र ते अद्यापपर्यंत सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी इंदापूर पोलिसांत खबर दिलेली आहे.
प्रियंका विष्णू केमदारने यांनी पत्रकारांसमोर येऊन खळबळजनक माहिती दिली. या माहितीमध्ये प्रमुख इंदापूर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकार्यांवर प्रियंका यांनी आरोप केले आहेत. माझे पती वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या त्रासाला वैतागून बेपत्ता झाले आहेत. ते माघारी आले नाहीत तर, पोलिस स्टेशन समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रियंका यांनी दिला आहे. पत्नी प्रियंका यांना पोलिस कर्मचारी विष्णू केमदारने लिहिलेली चिठ्ठी मात्र सोशल मीडियावर दिवसभर फिरत होती. या चिठ्ठीमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकार्यांवर गंभीर आरोप केल्याचे दिसते आहे.
एक चिठ्ठी समोर…
विष्णू केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी देखील समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मागील दोन महिन्यांपासून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलिस हवालदार रासकर आणि पोलिस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असे या चिठ्ठीत लिहिलेले आहे.
विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवरती देखील एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवलेला आहे. माझ्या या अवस्थेला, होणाऱ्या परिणामांना पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत असंही या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे. या संपूर्ण खळबळजनक घटनेनंतर इंदापूर पोलिस ठाण्यात विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी आपले पती हरवल्याची तक्रार देखील दाखल केली असून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सवाल उपस्थित केला आहे. खात्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देताय, माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या करेल असा इशारा प्रियंका केमदारणे यांनी दिला आहे.
चिठ्ठीद्वारे केलेल्या आरोपांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी होणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली आहे. इंदापुरातून पोलिस हवालदार विष्णू केमदारणे हे काल (मंगळवारी) पहाटेपासून बेपत्ता झालेत. केमदारणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून या चक्कीतून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी प्रतिक्रिया दिली असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नीची तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिस खात्याकडून या संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्यासाठी पोलिस पथक तयार करण्यात आले आहे. चिठ्ठीमध्ये केमदारणे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी केली जाईल आणि त्या पद्धतीचा अहवाल कार्यालयाला पाठवला जाईल अस उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
केमदारणे इंदापूर पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. मात्र, 27 एप्रिल रोजी त्यांचा इंदापूर पोलिस ठाण्याकडील पदभार काढण्यात आला होता अशी माहिती आहे. तर भिगवण पोलिस ठाण्यामध्ये त्यांना रुजू होण्यासाठी कळवण्यात आलं होतं. मात्र केमदारणे यांनी भिगवन पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला नव्हता. प्रियंका केमदारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण सकाळी झोपेतून उठायच्या आधीपासून आपले पती घरी नाहीत. ते सकाळी झोपेतून उठल्यानंतर क्रिकेट खेळण्यासाठी जातात. आठ वाजून गेल्यानंतर मी त्यांच्या सर्व मित्रांकडे चौकशी केली. साडेआठ वाजता माझा मोबाइल बघितला. त्यावेळी आपल्या पतीने मोबाइलवर रेकॉर्डिंग व चिठ्ठी पाठवल्याचे दिसले. तीच चिठ्ठी नंतर घरातील ड्रॉवरमध्ये आढळली. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, विनोद रासकर व सूर्यवंशी यांची नावे या चिठ्ठीत होती. त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली, असे चिठ्ठीत लिहिले होते, अशी माहिती प्रियंका यांनी दिली.
मला मागील दोन महिन्यांपासून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी हवालदार विनोद रासकर व पोलिस कर्मचारी सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून तुझी नोकरी व पुढील आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन, अशी भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्या या अवस्थेला व पुढे होणाऱ्या परिणामांना हे तिघे जबाबदार आहेत, असे विष्णू केमदारणे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. त्या कथित कॉल रेकॉर्डमध्ये पोलिस निरीक्षक कोकणे यांचा आवाज असल्याचे सांगितले जात आहे.27 एप्रिलला केमदारणे यांच्याकडील इंदापूर पोलिस ठाण्यातील पदभार काढून त्यांना भिगवण पोलिस ठाण्यात रुजू होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते हजर झाले नाही.
धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या…
मुंबई रेल्वे अपघातात जवानाच्या मृत्यूने अनेकांच्या अश्रूचा फुटला बांध…
पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…
पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…
पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…

