घाटंजी पोलिस ठाण्यात बकरी ईद निमीत्त शांतता समितीची बैठक…

घाटंजी, यवतमाळ : घाटंजी तालुक्यात आगामी सण – उत्सवांच्या पार्श्वभूमीवर घाटंजी शहरात व तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी घाटंजी पोलिस ठाण्यात बकरी ईद निमीत्त (ईद – उज – जुहा) शांतता समितीची बैठक दि. २७ मे २०२५ रोजी बुधवारला पार पडली. ही बैठक नवनिर्वाचित ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे (POLICE INSPECTOR KESHAV THAKRE) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजेश घोडके हे उपस्थित होते. तसेच घाटंजी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी वर्ग, विविध धर्मीय समुदायाचे प्रतिनिधी, वृत्त संकलक, पत्रकार व पोलिस अधिकारी आदीं उपस्थित होते.

पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’

बकरी ईद निमीत्त शांतता समितीच्या बैठकीत घाटंजी शहरातील सण – उत्सव शांततेत व कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पाडण्यावर भर देण्यात आला. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणेदार केशव ठाकरे यांनी या वेळी दिला. सणांच्या काळात पोलिस गस्त वाढवण्यात येईल आणि आवश्यक तेथे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील निगराणी ठेवली जाईल, असेही पोलिस विभागातर्फे या वेळी सांगण्यात आले. तसेच सर्व धर्मीय नागरिकांनी आपापसात समन्वय ठेवून सण साजरे करावेत, शांततेचे वातावरण राखावे असे आवाहन, यावेळी ठाणेदार ठाकरे यांनी केले.

उपस्थित सदस्यांनी पोलिस प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक करत पूर्ण सहकार्याची करण्याची ग्वाही दिली आणि घाटंजी शहरात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचा निर्धार या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय गढीया, संदीप मुनोत, शेतकरी संघटनेचे मोरेश्वर वातीले, सुनिल नगराळे, भाजपाचे संदीप माटे, निवृत्त पोलिस अधिकारी होमदेव किनाके, सैय्यद हफीज, कॉग्रेसचे विजय कडू, सामाजिक कार्यकर्ते मधुकर निस्ताने, आकाश जाधव, पत्रकार बाळ ठाकरे, कैलास कोरवते, संतोष अक्कलवार, संतोष पोटपिल्लेवार, अरूण कांबळे, अरविंद चौधरी, सागर सम्मनवार, जितेंद्र जुनघरे, निरज मन्ने यांच्यासह घाटंजी शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Video: डॉ. अजय तावरे हाच किडनी रॅकेटचा सूत्रधार…

मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

यवतमाळ येथील खुनाच्या खटल्यातील आरोपीला जामीन मंजूर…

यवतमाळ जिल्ह्यातील PI, API पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणूका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!