
नाशिक! बहिणीला प्रपोज केल्याने युवकाचा भररस्त्यात निर्घृण खून…
नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या रागातून युवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या झाल्याच्या धक्कादायक घटना गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
युवकाला तीन ते चार जणांनी बेदम मारहाण करत जीव घेतला आहे. या घटनेची माहिती गंगापूर पोलिस ठाण्याला देण्यात आली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. नसीम शहा असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. नाशिकच्या शिवाजीनगर परिसरात त्याची तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली आहे.
नसीम शहा यांचे याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. त्याने संबंधित मुलीला प्रपोज केले होते. याची माहिती मुलीच्या भावाला समजली. बहिणीला प्रपोज केल्याच्या कारणातून त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने नसीमला सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास गाठले. चारही आरोपींनी नसीमला बेदम मारहाण केली. मारहाणीत नसीमचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र बहिणीला केवळ प्रपोज केल्याच्या रागातून अशाप्रकारे तरुणाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीमधील विवाहित महिलेची आत्महत्या…
नाशिक! मित्राच्या मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर पॉर्न व्हिडीओ दाखवला अन्…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…
नाशिक! बापाने पोटच्या मुलाचा गळा दाबला अन् मृतदेह गोणीत भरून…
मुळशी पटर्न! नाशिकमध्ये तडीपार सराईत गुंडाला टोळक्याने घरात घुसून संपवलं…

