
जळगाव! विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणात आला नवीन ट्विस्ट…
जळगाव: जळगाव तालुक्यातील किनोद येथे एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली होती. मात्र या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि नणंद यांनी गळा आवळून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. गायत्री यांच्या मागे तिचे पती, मुलगा ध्रुव (वय 5), मुलगी नियती (वय 7) असा परिवार आहे. जळगाव तालुक्यातील किनोद येथे पती, सासू आणि दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. गायत्री या शिवणकाम करत होत्या. गुरुवारी 1 मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती गायत्रीच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गायत्रीने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप गायत्रीचा भाऊ, बहीण आणि मावशीने केला आहे.
गायत्री यांचा भाऊ सागर कोळी यांनी सांगितले की, ‘गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून घरात किरकोळ वाद झाला. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. घरात घडलेल्या वादानंतर तिने हा प्रकार वडिलांना सांगितला होता. पण वडील बाहेरगावी गेले होते. तिची सासू आणि नणंद यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करत गायत्रीच्या गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले.’
दरम्यान, गायत्रीने गळफास घेतल्याचे समजल्यानंतर तिचे पती, सासू आणि नणंद फरार झाले होते. आत्महत्या नसून तिचा खून करण्यात आला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. तसेच दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र त्यांनी घेतला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
नाशिक! बापाने पोटच्या मुलाचा गळा दाबला अन् मृतदेह गोणीत भरून…
मुळशी पटर्न! नाशिकमध्ये तडीपार सराईत गुंडाला टोळक्याने घरात घुसून संपवलं…
सैराटची पुरावृत्ती! वडील आणि मलगी समोरासमोर आली अन् नको ते घडलं…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

