पुणे जिल्ह्यातील काळूबाई व तुळजाभवानी मंदिरात चोरी…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): धामणी (ता.आंबेगाव) या गावचे हद्दीत हिवरकरमळा येथील काळुबाई माता व तुळजाभवानी माता मंदिरात पाच दिवसापूर्वी चोरट्यांनी चोरी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

काळुबाई माता व तुळजाभवानी माता मंदिरांचे सेप्टी दरवाजांचे कडीकोयंडे तोडून मंदिरातील काळुबाई, तुळजाभवानी मंदिरातून वीस हजार रुपये किमतीचे काळुबाई देवीचे पाच ग्रॉम वाजनाचे सोन्याचे दोन वाट्या व चार मोठे मनी असलेले मनी मंगळसुत्र, सोळा हजार रूपये किमतीचे तुळजाभवानी देवीचे चार ग्रॅम वजनाचे चार सोन्याचे मनी असलेली काळ्या मन्यांची पोथ, आठ हजार रुपये किमतीचे काळुबाईचे लहान मुर्तीचे दोन ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे मनी असलेली काळ्या मन्यांची पोथ, चार हजार रूपये किमतीच्या चारशे ग्रॅम वजनाच्या काळुबाई माता मंदिरामधील चांदीच्या पादुका, चार हजार रुपये किमतीच्या चारशे ग्रॅम वजनाच्या तुळजाभवानी माता मंदिरामधील चांदीच्या पादुका, चार हजार रुपये रोख रक्कम दोन्ही मंदिराचे दान पेटयांमधील त्यात वेगवेगळ्या चलणी नोटा व नाणी असे मिळून ५६०००/ हजार रुपयांची चोरी चोरट्यांनी केल्याचे पारगाव पोलीसांनी सांगितले.

शंकर सखाराम हिवरकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञान चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पारगाव पोलीस स्टेशनचे सहयाक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद घोडके व ठाणे अंमलदार नरेंद्र गोराणे हे करीत आहे. दरम्यान, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या चोरीकडे गांभीर्याने पाहून रात्रीची गस्त घालावी अशी मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे.

हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे…

वाल्मीकच्या एन्काऊंटरची ऑफर अन् निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांचा खळबळजनक Video…

सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…

इनोव्हाच्या डिक्कीतून बाहेर लटकलेल्या हाताबाबत पोलिसांनी सत्य आणलं समोर…

संतापजनक Video: सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिकवल्या अश्लील शिव्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!