सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने केली सासूची हत्या अन् बुलेटवरून झाली फरार…

जालना : सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने सासूची हत्या केल्यानंतर एका व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाल्याची घटना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत घडली आहे. संगिता संजय शिनगारे असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सुनेने हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत भरला. पण, गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला नसल्याने सून तिथेच मृतदेह सोडून पसार झाली. घरमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पचंनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. फरार झालेल्या आरोपी सुनेचा पोलिस शोध घेत आहेत.

प्रतिक्षा शिनगारे असे आरोपी सूनेचे नाव आहे. मृत महिलेचा मुलगा नोकरीनिमित्त लातूरला असतो. सासू आणि सून दोघीच भाड्याच्या घरात जालन्यात राहत होत्या. मुलगा सुट्टीच्या दिवशी येत असे. सासू सुनांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वादातूनच पहाटे सुनेने सासूचे डोके भिंतीवर आदळले, त्यात सासूचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला. मात्र, तो उचलता न आल्याने सून तिथेच टाकून फरार झाली आहे. शेजारी राहणाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी सून एका अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाली. त्यानुसार पोलिस सून व बुलेटस्वाराचा शोध घेत आहेत.

दरम्यान, प्रतीक्षा हिचा विवाह सहा महिन्यापूर्वी आकाशसोबत झाला होता. शिनगारे कुटुंब हे मुळचे बीडचे आहे. लग्नानंतर जालना येथे राहण्यासाठी आले होते. आकाश हा लातूर येथे नोकरीला होता. तर सासू आणि सून दोघी जालन्यात भाड्याने राहत होत्या. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…

शिक्षिकेने ओढलं विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात अन् स्वतःच अडकली…

मोबाईलवरून अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात दगड घालून केला खून…

पुणे! माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन केलं लग्न अन् तीनवेळा गर्भपात…

चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!