
हृदयद्रावक! मानसी लोहगडावरील एका कठड्यावर निराश अवस्थेत बसली अन्…
पुणे : परीक्षेला बसत न आल्याने नैराश्यातून एका युवतीने लोहगडावर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसी गोविंदपूरकर असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या सांगवी येथून बेपत्ता झालेल्या मानसी गोविंदपूरकर हिने लोणावळ्यातील लोहगडावर आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. मानसी एल.एल.बी च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. नुकतीच एल.एल.बी ची परीक्षा पार पडली यात तिला आजारी असल्याने बसता आले नाही. याच नैराश्यातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे, अशी प्राथमिक माहिती सांगवी पोलिसांनी दिली.
मानसी 18 मार्चपासून सांगवी येथून बेपत्ता होती. सांगवी पोलीस ठाण्यात देखील ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मानसी हिने लोणावळ्याच्या लोहगडावर जाऊन शेकडो फूट लोहगडाच्या किल्ल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. लोहगडच्या तिकीट घराजवळ सीसीटीव्हीत मानसी कैद झाली होती. यावेळी ती एका कठड्यावर निराश बसलेली दिसून आली होती. मात्र, मानसीने हे टोकाचे पाऊल उचलायचे नव्हतं, घरातील पालकांना याबाबत एकदा तरी बोलायचं होते, मात्र या पद्धतीने आपली जीवन यात्रा समाप्त करून नातेवाईकांना दुःखाच्या खाईत सोडून तिने अखेर या जगाचा निरोप घेतला. मानसीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…
हृदयद्रावक! धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! मुलांची हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी घेतला गळफास…
हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…
हृदयद्रावक! महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडल्याने अपघाती मृत्यू…

