धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…

लातूर : लातूरच्या रस्त्यावर एका युवकाला 5-7 जणांकडून बेदम अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.

राजश्री बार आणि क्लबमध्ये काही युवकांमध्ये वाद झाला, या वादानंतर युवकाच्या डोक्यात दगड घालून तसेच त्याचे कपडे काढून अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच

लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या एका बारच्या पुढे हा थरार सुरू होता. याच ठिकाणी असलेल्या राजश्री बार आणि क्लबमध्ये काही युवकांचा वाद झाला. बारमध्ये हाणामारी झाल्यानंतर हा वाद रस्त्यावर आला. रस्त्यावर 5-7 जणांनी मिळून एका युवकाला नग्न करून मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात, अंगावर दगडेही मारण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी जखमी तरुणाला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले आहे. युवकाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. युवकावर हल्ला करून आरोपी फरार झाले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत, अशी माहिती लातूर पोलिसांनी दिली आहे.

गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्‍याला बेदम मारहाण…

आमदाराच्या पीएला रस्त्यावर खेचत केली बेदम मारहाण; कारण…

धक्कादायक! मुलीच्या नातेवाईकांनी केली वृद्ध वडिलांना बेदम मारहाण; जीव गेला…

Video: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…

Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!