
शेवग्याच्या शेंगा काढण्यावरून वाद आणि मारामारी मध्ये ज्येष्ठाचा मृत्यू…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील शेतामध्ये (साबरे मळा) शेवग्याच्या शेंगा काढल्या बद्दल वाद होऊन झालेल्या मारामारी मध्ये चंद्रकांत सदाशिव चासकर (वय ६९) यांचा मृत्यू झाला आहे.
सदर गुन्ह्याबाबत मिळालेली माहिती अशी की, २५/२/२०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता शेवगाच्या शेंगा काढल्याचा राग धरून २६/२/२०२५ रोजी सकाळी आठ वाजता जाब विचारण्यास गेले असताना वाद होऊन झालेल्या मारामारी मध्ये चंद्रकांत सदाशिव चासकर (वय ६९) यांचा लाथा बुक्क्यांनी व छातीत मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला आहे. अशा आशयाची फिर्याद मुलगा किरण चंद्रकांत चासकर (वय ४२) यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली आहे.
आरोपींची नावे खालील प्रमाणे १) सुभाष सदाशिव चासकर (चुलता), २) मंदा सुभाष चासकर (चुलती), ३) सचिन सुभाष चासकर (चुलत भाऊ), ४) नितीन उर्फ दत्ता सुभाष चासकर (चुलत भाऊ, सर्व राहणार साबरे मळा म्हाळुंगे पडवळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार स. पो. निरीक्षक बडगुजर मंचर पोलिस स्टेशन करत आहेत.
रील स्टार मुलाचा माजी सैनिक असलेल्या बापाने केला खून अन्…
आरोपी दत्ता गाडे याला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे; पण खरं पकडलं कोणी पाहा…
IT मॅनेजरनं Live Video करत छळाला कंटाळून संपवलं आयुष्य…
हृदयद्रावक! तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! गतीमंद मुलीला वेदना असह्य होत असल्याने गुंगीच्या गोळ्या देऊन मारलं अन्…

