
रील स्टार मुलाचा माजी सैनिक असलेल्या बापाने केला खून अन्…
जळगाव : रील स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मुलगा दारु पिऊन सातत्याने कुटुंबियांना मारहाण करत असल्यामुळे त्रासलेल्या माजी सैनिक असलेल्या बापाने आणि त्याच्या भावाने मिळून त्याची गळा दाबून हत्या केली. रील स्टार विकी पाटील याच्या हत्येनंतर त्याचे वडील विठ्ठल पाटील यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे विठ्ठल पाटील हे माजी सैनिक आपली पत्नी आणि सून मुलाच्या समवेत गेल्या अनेक वर्ष पासून राहत आहेत. त्याचा मुलगा विकी हा सोशल मिडियात रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता. त्याला दारूचे व्यसन लागले होते. दारूच्या नशेत तो आपल्या वडिलांना मारहाण करायचा. विकीचे आई वडील त्याला कंटाळले होते. 25 फेब्रुवारी रोजी विकीने मोठ्या प्रमाणात मद्यपान करून आपल्या वडीलांना मारहाण केली. त्यानंतर वडिलांनी आपल्या भावाच्या मदतीने आपला विकी याची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह गावालगत असलेला धरणाच्या ठिकाणी पुरून टाकला होता.
मुलाच्या हत्येनंतर विठ्ठल पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी विठ्ठल पाटील यांच्या खिशात मिळून आलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपण आपल्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह धरणात पुरला असल्याचे लिहिले होते. पोलिसांनी या चिठ्ठीचा आधार घेत तपास केला असता विकीचा मृतदेह धरणाच्या ठिकाणी आढळून आला. या घटनेत पोलिसांनी अधिकचा तपास केला असता, विकीची गळा दाबून हत्या करण्यामध्ये त्याचे वडील विठ्ठल पाटील आणि त्यांचे बंधू आणि जेसीबी चालक यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या सगळ्याच्या विरोधात एरंडोल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखला करून त्यांना अटक केली आहे.
विकीच्या त्रासाला कंटाळून आपले पती विठ्ठल पाटील यांनीच त्याची हत्या केल्याचे विकीची आई आणि विठ्ठल पाटील यांच्या पत्नी संगीता पाटील यांनी म्हटले आहे. विकीची पत्नी पायल यांनी आपले सासरे विठ्ठल पाटील यांना आपल्या शर्टाची बटण देखील लावता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीची हत्या केली हे आपल्याला पटत नाही. या घटनेत त्यांनी आपले चुलत सासरे यांच्या परिवाराचा हात असल्याचे सांगत, ज्यांनी आपल्या पतीला मारले त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि आपल्या पतीला न्याय मिळाला पाहिजे, असे म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आरोपी दत्ता गाडे याला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे; पण खरं पकडलं कोणी पाहा…
IT मॅनेजरनं Live Video करत छळाला कंटाळून संपवलं आयुष्य…
हृदयद्रावक! तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! गतीमंद मुलीला वेदना असह्य होत असल्याने गुंगीच्या गोळ्या देऊन मारलं अन्…
पत्नीचे अनैतिक संबंध; नवऱ्याने उचलले धक्कादायक पाऊल…

