
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मामा भाच्याला अटक…
मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या दोघा मामा भाच्याला बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून मुंबई एटीएसने अटक केली आहे. मंगेश वायाळ व अभय शिंगणे असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचे देऊळगाव येथे मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. हे दोघेही संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई एटीएसने रात्री दोन वाजता कारवाई करत देऊळगाव येथून या दोघांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरूवारी (ता. 20) देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यांचा शोध घेऊन बुलढाणा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. दोघांना चौकशीसाठी मुंबईत घेऊन येत आहे.
सध्या तपास यंत्रणा या दोघांनी एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी का दिली याचा शोध घेत आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून हा ईमेल पाठवला, याचा शोध घेतला जात आहे. याबाबतचा तपास सुरू आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला अपघात…
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा…
राज्यातील वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ…
राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय…
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटकेनंतर छातीत लागले दुखू…

