पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारा ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६च्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

युनिट ६ पथकातील अधिकारी व अंमलदार असे वाघोली पोलिस ठाणे हद्दीत २८/०२/२०२५ रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत होते. पोलिस अंमलदार नितीन मुंढे यांना घरफोडीचे गुन्हे करणारा अभिलेखावरील एक आरोपी हा डी. मार्ट जवळ, लोहगाव वाघोली रोड, वाघोली, पुणे येथे उभा असल्याचे गोपनीय बातमी प्राप्त झाली. सदर ठिकाणी राहुल दगडू शिंदे (वय ३२ वर्षे, रा. पिरंगुट, पुणे) हा संशयितरीत्या मोटार सायकल सह उभा असताना मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊन लागला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या वर्णनाचे एकूण ८७ ग्रॅम सोन्याचे दागिने, एकूण किंमत रु. ०६,४०,३२२/- मिळून आले. पोलिस अमंलदार पवार यांनी नमुद आरोपीताकडे त्याचे ताब्यातील मो / सा बाबत चौकशी केली असता नमुद मो / सा ही चोरीची असल्याचे आणि त्याने आणखी एक मो / सा चोरी केल्याची माहिती मिळून आली.

आरोपीकडे केलेल्या अधिक चौकशी मध्ये त्याने सदरचे सोन्याचे दागिने हे लोणीकंद व लोणी काळभोर पो.ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याचे ताब्यातील मो / सा ही रावेत पो. ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकंदरीत तपासामध्ये खालील नमूद घरफोडीचे व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
घरफोडीचे गुन्हे
१. लोणीकंद पो.स्टे. गु. र. क्र. ८३७/२४ भा.न्या संक ३३१(४),३३१(३),३०५
२. लोणीकंद पो.स्टे. गु.र. क्रं. १०४५/२४ भान्या संक ३३१ (४),३०५ (अ)३
३. लोणीकंद पो.स्टे. गु. र. क्रं. ९५८ / २३ भा. न्या संक ४५४,४५७,३८०
४. लोणी काळभोर पो.स्टे. गु. र. क्रं. १५१ / २४ भा.न्या संक ४५४,४५७,३८०
५. लोणी काळभोर पो.स्टे. गु.र. क्रं. ४५६ / २४ भा. न्या संक ३३१ ( ४ ), ३०५ मो/सा चोरीचे गुन्हे
१. रावेत पो.स्टे. गु. र.क्रं. ३२१/२४ (हिरो होंडा स्प्लेंडर) भा.न्या सं क ३०३(२)
२. लष्कर पो.स्टे. गु.र.क्रं. २७६/२४ (वेस्पा मोपेड) भा.न्या सं क ३०३(२)
एकूण हस्तगत मालमत्ता किं.रू.०७,४०,३२२/- असे सदर आरोपीताविरुद्ध पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात चोरी, घरफोडी आणि मो/ सा चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगीरी अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे – २ राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा युनिट ६ प्रभारी पोलिस निरीक्षक वाहीद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे, पोलिस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, प्रतिक्षा पानसरे, चालक पो. अंमलदार सुहास तांबेकर यांनी केली आहे.

पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

पुणे शहरात गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच; रात्रीत 40 गाड्यांची तोडफोड…

पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…

पुणे शहरात पोलिसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचे अंमली पदार्थ, गांजा जप्त…

धक्कादायक! पुणे शहरात चिमुकल्यासमोरच कात्रीने कापला पत्नीचा गळा; सांगितलं कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!