पत्नी मला मारते अन् तिची इच्छा आहे की माझा मृत्यू व्हावा…

बेंगळुरू (कर्नाटक): एका विवाहित व्यक्तीने आपल्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली असून, त्यामध्ये पत्नीवर आरोप केले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटर गोल्लापल्ली या व्यक्तीने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पीटर एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. चिठ्ठीत पीटरने वडिलांना उद्देशून लिहिले की, ‘डॅडी मला माफ करा. माझी पत्नी पिंकी मला मारते. तिची इच्छा आहे की माझा मृत्यू व्हावा. मी माझ्या पत्नीच्या छळामुळे मरणार आहे.’

पीटर आणि पिंकी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे लग्नाच्या तीन महिन्यांनंतर ते वेगळे राहायला लागले. पीटरच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करून 20 लाख रुपयांची पोटगी मागतली होती. कुटुंबीयांनी सांगितले की, ‘मागील तीन महिन्यांपासून पीटर आणि त्याच्या पत्नीमध्ये मतभेद सुरू होते. पीटरचा भाऊ म्हणाला की, ‘आम्ही सर्वजण रविवारी चर्चमध्ये गेलो होतो. दुपारी परत आल्यावर पीटर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. माझा भाऊ एका खासगी कंपनीत काम करत होता. मात्र तीन महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली. आम्हाला माझ्या भावासाठी न्याय हवा आहे. त्या महिलेला (पीटरची पत्नी पिंकी) अटक केली पाहिजे. कोणालाही माझ्या भावाने भोगलेल्या यातना भोगायला लागू नयेत. पिंकीच्या मोठ्या भावानेही त्याला मारहाण केली होती. याबाबत आम्ही पोलिसात तक्रात देखील दिली होती.’

दरम्यान, पीटरच्या भावाच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…

हृदयद्रावक! बंगळुरुच्या इंजिनिअरनं मृत्यूपूर्वी दिलं बाळाला गिफ्ट; सांगितलं 2038 मध्ये उघड…

‘प्रेमात माझी वाट लागली’, स्टेटस ठेवलं अन् घेतला जगाचा निरोप…

शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला…

नाशिकमध्ये पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून पुलावरून उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!