
लोणीकंद व वाघोली परिसरातील डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळी जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): लोणीकंद व वाघोली पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळीला जेरबंद करून एकुण १२ गुन्हे उघडकीस आणण्यात युनिट ०६ गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लोणीकंद व वाघोली पोलिस ठाणे हददीत विदयुत रोहीत्र (डी.पी.) मधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्हयांमध्ये सतत वाढ होत असल्याने वरिष्ठांकडून सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित करण्यात आले होते. त्याप्रमाणे लोणीकंद पोलिस स्टेशन गु.र.क्र. ६७७/२०२४, कलम १३६ भारतीय विदयुत कायदा सह कलम ३२४ (३) भा. न्या. सं . हया गुन्हयाचा पुढील तपास युनिट ६, गुन्हे शाखा येथे वर्ग करुन समांतर तपास करण्यात येत होता. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान पोलिस अंमलदार तनपुरे, युनिट ६, गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गोपनीय माहीती व तांत्रिक तपासाच्या आधारावर युनिट ६, गुन्हे शाखा पथकाने खालील नमुद आरोपी अटककेले आहेत.
१) अबरार बिलाल अहमद, वय २४ वर्षे, रा. जमुनी, ता. बांसी, जिल्हा. सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश
२) आफताबनियामतउल्ला खान, वय ३२ वर्षे, रा. बोरीगाव, शंकर मंदीराजवळ, उरण, नवी मुंबई
३) नफीज हमीद अब्दुल, वय २३ वर्षे, मुळ रा. जमुनी, ता. बांसी, जि.सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे यांनी लोणीकंद ता.हवेली जि. पुणे
४) मोबीन हमीद अब्दुल, मुळ रा. जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे
अटक आरोपींकडून एकुण १२ गुन्हे उघडकीस आणुन त्यामधील एकुण १०,४२,२६०/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलिस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार पोलिस सह आयुक्त पुणे रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलिस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०६ चे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलिस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितिन मुंडे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार,समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, शेखर काटे महिला पोलिस अंमलदार प्रतिक्षा पानसरे यांनी केली.
पुणे! विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी…
पुणे शहरातील बोपदेव घाटात दहशत माजविणाऱ्यांना सात जणांना केली अटक; पाहा नावे…
पुणे शहरात गुन्हे शाखे अंर्तगत मोठी कारवाई; सात पिस्तुल अन् ९ आरोपींना अटक…
पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…
पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…

