नाशिक! पत्नीला सर्वलोकी पाठवलं आता तिच्यासोबत जातोय…

नाशिक: नाशिकच्या जेल रोड परिसरातील गंगापूर भागात राहात असलेल्या एका निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पुढील तपास करत आहेत.

मुरलीधर जोशी असे आत्महत्या करणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकाचे नाव आहे. पत्नीच्या दीर्घ आजाराच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पोलिसांना घटना स्थळी सुसाईड नोट आढळली आहे.

निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांच्या पत्नी २०१७ पासून व्हेंटिलेटरवर होत्या. नुकतेच त्यांना घरी आणण्यात आले होते. मेंदू विकाराच्या आजाराने त्या त्रस्त होत्या. दीर्घ आजाराला कंटाळूनच मुरलीधर जोशी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पुढे आले आहे. मुरलीधर यांनी आधी पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. ‘पत्नीला सर्वलोकी पाठवलं आता तिच्यासोबत जातोय’, असे मुरलीधर जोशी यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.

दरम्यान, दाम्पत्याची दोन्ही मुलं मुंबईत उच्च पदस्थ अधिकारी आहेत. जोशी यांनी आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असे नोटमध्ये म्हटले आहे. प्राथमिक तपासात जोशी यांनी पत्नीच्या दीर्घ आजारपणामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचं समोर आले असलं तरी पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिला नाही. पोलिस हत्या आणि आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.

नाशिक! हॅप्पी होली म्हणत अंगावर ओतले पेट्रोल आणि लावली आग…

नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या…

प्रेमसंबंध! नाशिकमध्ये महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीतील नावे पाहा…

नाशिक हादरलं! मुलीनं लव्ह मॅरेज केलं म्हणून वडिलांनी आईला संपवलं…

नाशिकमध्ये पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून पुलावरून उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!