सांगलीत भीषण अपघातात 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू…

सांगली: सांगली सोलापूर महामार्गावर ऊसतोड मजूरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू तर, 10 ते 12 लोक जखमी झाले आहेत. ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक मुलगा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.

मंगळवेढा तालुका चिकलगी भुयार येथील ऊसतोड मजूर परत जात असताना हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. ऊस तोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत ऊसतोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी झाले आहेत. मृतातील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे. सदरची घटना नागपूर-रत्नागिरी महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय?

ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकने जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला.

मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर (वय 30 रा. शिरनांदगी), जगमा तम्मा हेगडे (वय 35), दादा आप्पा ऐवळे (वय 17), निलाबाई परशुराम ऐवळे (रा. चिक्कलगी) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! नवरदेवासह बहीण अन् भाचीचा अपघातात जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…

हृदयद्रावक! कन्येचा विवाह सोहळा पार पडला अन् बापावर काळाने घाला घातला…

अहमदनगर हादरलं! दारुड्याने संशयावरून पेटवले घर, तिघींचा होरपळून मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!