पुणेकरांच्या गाड्यांना आता ‘तीन अक्षरी’ नंबरप्लेट! MH-12 ऐवजी…

पुणे : पुण्यातील वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (RTO) दोन अक्षरी इंग्रजी वर्णमालेची मालिका संपण्याच्या मार्गावर आहे. लवकरच ‘MH-12’ अंतर्गत नोंदणी होणाऱ्या नवीन वाहनांना तीन अक्षरी वर्णमालेनुसार क्रमांक दिले जाणार आहेत. पुणे आरटीओने यासंदर्भातील हालचाली सुरू केल्या असून राष्ट्रीय माहिती केंद्राकडे (NIC) तसा प्रस्ताव पाठवला आहे.

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, राज्यांमध्ये इंग्रजी वर्णमालेच्या क्रमवारीनुसार वाहनांची नोंदणी केली जाते. पुण्यात आतापर्यंत ‘AA’ पासून सुरू झालेली मालिका ‘ZG’ पर्यंत पोहोचली आहे. साडेपाच कोटींहून अधिक वाहन क्रमांक वितरीत झाले आहेत. सण आणि मुहूर्तांमुळे वाढलेली वाहन विक्री पाहता लवकरच ही मालिका ‘ZZ’ पर्यंत पोहोचेल. त्यानंतर नवीन नोंदणीसाठी अक्षरे शिल्लक नसल्याने आता तीन अक्षरी (उदा. MH-12, AAA 5..9) मालिकेचे नियोजन सुरू आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन विभागाकडे लवकरच अंतिम प्रस्ताव पाठवून ही नवीन प्रणाली कार्यान्वित केली जाईल. यामुळे पुणे हे अशा प्रकारे तीन अक्षरी मालिका सुरू करणाऱ्या देशातील प्रमुख शहरांपैकी एक ठरणार आहे.

पुणे आरटीओच्या नोंदीनुसार शहरात वाहनांची संख्या…
दुचाकी: २९ लाख ८८ हजार ८१० (सर्वाधिक)
चारचाकी: ९ लाख १९ हजार ९६१
एकूण वाहने: ४३ लाख ५५ हजार ३८० (मार्च अखेरपर्यंत)

वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना मोजावी लागणार मोठी किंमत…

पुण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; दंड न भरल्यास थेट…

FASTag बाबत मोठा निर्णय; पाहा नवे नियम कधीपासून लागू…

वाहनाच्या Number Plate वरून कशी मिळवाल मालकाची माहिती…

HSRP Number Plate नसेल तर किती भरावा लागेल दंड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!