
प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
पुणे शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) म्हणून कार्यरत असलेले प्रवीण कुमार पाटील गेल्या २७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाळू आणि जमीनमाफियांना आळा घालण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रखरपणे उपाययोजना आखल्या होत्या. गंभीर गुन्हे त्यांनी उघड केले असून, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात…
प्रवीण कुमार पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर या पदावर १९९९ ते २००२ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करत गुन्हे उघडकीस आणणे, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व कायदा सुव्यवस्था सांभाळणे यात त्यांचा उपविभाग जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर ठेवला होता. हवेली (पुणे ग्रामीण) या उपविभागात २००२ ते २००६ या कालावधीत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून नावलौकिक मिळविला. नानविज दौंड येथे पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून काम करत असताना दुर्लक्षित असलेले पोलिस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणले. मुंबईतील परिमंडळ-१२ येथे पोलिस उपायुक्त म्हणून काम केले. सदर कालावधीत परिमंडळातील कायदा व सुव्यस्था परिस्थीति उत्कृष्टपणे हाताळली व अनेक गंभीर गुन्हे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. विशेष कामगिरी म्हणजे २६/११ च्या हल्ल्यातील पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब याला ऑर्थर रोड जेलमधून येरवडा जेलमध्ये नेण्यासाठी अमलात आणलेल्या ‘ऑपरेशन एक्स’मध्ये श्री. पाटील यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. श्री. पाटील यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपतिपदक मिळाले आहे.
बालपण…
प्रवीण कुमार पाटील यांचा कावपिंप्री (ता. अंमळनेर, जि. जळगाव) येथील छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील जन्म. अभ्यासामध्ये पहिल्यापासून हुशार. प्रथम क्रमांक तर शेवटपर्यंत कधी सोडलाच नाही. शालेय शिक्षण घेत असताना स्कॉलरशिपमधून मिळालेल्या पैशांवरच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. कोणताही क्लास न लावता स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले आणि वयाच्या २४व्या वर्षी पोलिस अधिकारी झाले.
शिक्षण…
१ ते ७ – जिल्हा परिषद शाळा, कावपिंप्री
८ ते १० – प्रताप हायस्कूल, अंमळनेर
११ ते १२ – प्रताप महाविद्यालय, अंमळनेर
बीएसस्सी – अग्रिकल्चर कॉलेज, धुळे
एमएसस्सी – राहुरी
एलएलबी – पुणे विद्यापीठ
कावपिंप्री आणि शिक्षक…
कावपिंप्री हे ५०० लोकसंख्या असलेले छोटे गाव. गावामध्ये प्राथमिक शिक्षण झाले. पुढे शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी म्हणजे अंमळनेर येथे जावे लागे. अंमळनेरला जाताना अनेकदा बैलगाडीमधून प्रवास केला आहे. शिक्षक मन लावून तळमळीने शिकवत असत. स्कॉलरशिपच्या परीक्षेचा अभ्यास घेताना शिक्षक कधी घड्याळाकडे पाहत नसत. चौथी आ¬णि सातवीमध्ये असताना शिक्षकांमुळे स्कॉलरशिप मिळाली. खरंतर, शिक्षकांमुळे माझ्यासह अनेक विद्यार्थी घडल्याचे प्रवीण कुमार पाटील सांगतात.
स्पर्धा परीक्षेचा ग्रुपने अभ्यास…
राहुरी येथे एमएसस्सीचा अभ्यासासाठी विविध भागांमधून शेतकरी कुटुंबातील मुले येत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पोषक असे वातावरण असायचे. शिवाय, ग्रुपने अभ्यास केल्यामुळे फायदा होत असे.
साहेब झाला मुलगा…
प्रवीण कुमार पाटील यांच्या कुटुंबामध्ये पोलिस दलामध्ये कोणीही नव्हते. पण, अभ्यासाच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केले. वयाच्या २४व्या वर्षी डीवायएसपी झाले. कावपिंप्री या गावातील ते पहिले पोलिस अधिकारी ठरले आहेत. प्रवीण कुमार पाटील हे डीवायएसपी झाल्याचे समजल्यानंतर आई-वडिलांसह सर्वांनाच आनंद झाला. मुलगा साहेब झाल्याचे अनेकजण सांगायला घरी येत. पण, शेतकरी कुटुंब असलेल्या आई-वडिलांना डीवायएसपी म्हणजे काय असते हे माहित नव्हते. पण, १९९६ साली मुलगा साहेब झाला हे समजल्यानंतर मोठा आनंद झाला होता.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…