
गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
गजानन पवार हे गेल्या २९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शाळेमध्ये असताना कबड्डी खेळाची आवड निर्माण झाली आणि पुढे ते देशपातळीपर्यंत खेळले. खरं तर कबड्डी खेळामुळेच ते पोलिस दलात दाखल झाले. पोलिस अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक गुन्हे उघड केले असून, पर्यायी अंगावर गोळ्याही झेलल्या आहेत. त्यांच्या उत्कृष्ट अशा कामाची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदकासह विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात…
गजानन पवार यांचे मूळ गाव अहमदनगर. अहमदनगर शहरामध्येच त्यांचे शिक्षण झाले. कुटुंबातील पोलिस दलात कोणीही नव्हते. कबड्डी खेळ खेळत असताना राहुरी येथे अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क आला आणि स्पर्धा परीक्षेविषयी समजले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि पहिल्या प्रयत्नातच यशाला गवसणी घातली. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर विविध गुन्हे त्यांनी उघड केले आहेत.
शिक्षण…
१ ते ४ – शारदा मंदिर, अहमदनगर
५ ते १० – न्यू इंग्लिश स्कूल, अहमदनगर
११ वी ते पदवी – न्यू आर्ट्स स्कूल, अहमदनगर
कबड्डीपट्टू…
गजानन पवार यांना शाळेमध्ये असताना कबड्डी खेळाची आवड निर्माण झाली होती. उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून काही दिवसांतच त्यांनी ओळख निर्माण केली होती. शाळेसह सहयोग क्रीडा क्लबकडून खेळले. पुणे विद्यापीठाकडून खेळले. देशपातळीवर कबड्डी खेळत असताना त्यांनी विविध पुरस्कार मिळविले आहेत. कबड्डी खेळामुळेच त्यांच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली.
एमपीएससी परीक्षा…
विद्यार्थिदशेत असताना कबड्डी खेळामुळे त्यांची राहुरी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क आहे. दरम्यान, त्यांनी पदवी घेतली होती. राहुरी विद्यापीठामधील अनेक विद्यार्थी एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी बनत असल्याचे समजले. कबड्डी खेळ तर आहेच पण याबरोबरच अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कोणताही क्लास न लावता ग्रुपने अभ्यास केला. ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासाचा फायदा झाला आणि स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नातच पास झाले. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी पोलिस अधिकारी म्हणून पोलिस दलात दाखल झाले.
पोलिस दलातील कार्यकाळ…
१९९५ – प्रशिक्षण
मुंबई शहर, पुणे शहर, नागपूर, सीआयडी, पुणे शहर
पुरस्कार…
२०१० – पोलिस महासंचालक पदक
२०१९ – राष्ट्रपती पोलिस पदक
२०२१ – राष्ट्रपती शौर्य पदक
गजानन पवार यांनी पोलिस दलात दाखल झाल्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर, सीआयडी विभागामध्ये काम करत असताना अनेक गुन्हे उघड केले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना पोलिस महासंचालक, राष्ट्रपती पोलिस पदक, राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले आहे. विविध गुन्हे उघड करत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. गुन्हे उघड करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.
लोकमान्य टिळक यांची ऐतिहासिक भांडी चोरीला…
पुणे शहरामध्ये काम करत असताना केसरीवाडा येथून लोकमान्य टिळक यांची ऐतिहासिक भांडी चोरीला गेल्याची घटना घडली होती. गुन्ह्याचा तपास गजानन पवार यांच्याकडे आला होता. त्यांनी अवघ्या १२ तासांत गुन्हा उघड केला. शिवाय, ऐतिहासिक भांडी पुन्हा मिळवली. चोरीला गेलेल्या भांड्यांवर लोकमान्य टिळक यांचे नाव लिहिलेले होते. ऐतिहासिक भांडी परत मिळविल्याचे मोठे समाधान मिळाले.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

