रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
रामनाथ पोकळे हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. राज्यातील विविध भागांमध्ये विविध पदांवर त्यांनी कामे करत असताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे मोठे काम केले आहे. प्रशासनात काम करत असताना धडाकेबाज निर्णय घेऊन गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे काम केले. ग्रामीण भागातून पुढे येऊन एक आदर्श निर्माण केला आहे. रामनाथ पोकळे हे अपर पोलिस आयुक्त गुन्हे शाखा म्हणून पुणे शहर पोलिस दलात सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात…

रामनाथ पोकळे यांची शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे, तसेच गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे या गोष्टींना त्यांनी नेहमी प्राधान्य दिले आहे.

शेतकरी कुटुंबातील जन्म…
रामनाथ पोकळे यांचे बीड जिल्ह्यातील अंमळनेर हे त्यांचे मूळ गाव. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील जन्म. प्राथमिक शिक्षण अंमळनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्या मंदिर, अंमळनेर या शाळेत झाले. परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठातून अॅग्रिकल्चर शाखेतून बीएसस्सी व एमएसस्सी पदवी प्राप्त केली.

मित्रांचा गोतावळा आणि स्पर्धा परीक्षा…
रामनाथ पोकळे यांना शालेय जीवनापासून मित्र जोडण्याची आवड असल्यामुळे त्यांचा मित्रांचा गोतावळा मोठा आहे. मित्र गोतावळ्यामुळे कृषी विद्यापीठात असताना त्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती समजली. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या मुलांना त्या काळी स्पर्धा परीक्षेबाबत फारशी माहिती नसे. पण, रामनाथ पोकळे यांना विद्यापीठात शिकत असताना स्पर्धा परीक्षेबद्दल मित्रांकडून माहिती समजली आणि मित्रांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी अभ्यास सुरू केला होता.

डीवायएसपीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण…
मराठवाडा कृषी विद्यापीठात राहून मित्रांसोबत अभ्यास सुरू केला. त्यांनी तीन वेळा एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून वेगवेगळ्या पदांवर त्यांची निवड झाली होती. शिवाय, पोलिस उपअधीक्षक (डीवायएपी) पदाची परीक्षा ते महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि वयाच्या २४व्या वर्षी ते पोलिस दलात दाखल झाले आहेत.

पोलिस खात्याची आवड…
रामनाथ पोकळे यांच्या कुटुंबामध्ये कोणीही पोलिस दलात नव्हते. पण, लहानपणापासून खाकी वर्दीची आवड होती. ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असल्याने व शासकीय नोकरीमध्ये वरिष्ठ पदावर कुटुंबातील कोणीही नव्हते. पण, अभ्यास केला तर आपण वरिष्ठ पोलिस अधिकारी नक्कीच होऊ शकतो, हे विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांच्या लक्षात आले होते. कारण, सर्वसामान्य परिस्थितीतील अनेक मित्र त्यांच्या अगोदर MPSC परीक्षेत यश मिळवून अधिकारी झाले होते.

स्पर्धा परीक्षांबाबत गैरसमज…
१९९० च्या काळात आताप्रमाणे इंटरनेटची सुविधा नव्हती. त्यामुळे अभ्यास करताना एखाद्या विषयाची माहिती हवी असल्यास अनेक पुस्तकांमध्ये संदर्भाचा शोध घ्यावा लागत होता. माहिती तंत्रज्ञानाच्या अभावामुळे अनेक गोष्टींना बंधने येत होती. शिवाय, ग्रामीण भागात तर अनेक गोष्टींना अडचणींचा सामना करावा लागत असे. शासकीय नोकरीसाठी वशिला लागतो असा समज त्या काळी असे. पण, मित्रांसोबत अभ्यास करत असताना एक एक माहिती समजत गेली. अभ्यासाच्या जोरावरच स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते याची खात्री पटली. त्यामुळे स्वतः अनेक वेळा स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न केला.

१९९३ मध्ये पोलिस दलात रुजू…
१९९३-९४ मध्ये डीवायएसपीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्षे नाशिक व अमरावती येथे प्रशिक्षण झाले. त्यानंतर बीड, जालना, नाशिक ग्रामीण जिल्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम केले. जालना व नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अनेक दरोडे, जबरी चोरी करणाऱ्या टोळ्यांना त्यांनी जेरबंद केले. २००१ मध्ये मालेगाव व आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जातीय दंगलीत त्यांनी काम केले. तेथे एक कार्यक्षम व धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
जातीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भिवंडी शहरात सहायक पोलिस आयुक्त म्हणून काम करून कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कुशलतेने हाताळली. सहायक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर म्हणून काम पाहिले. वाहतुकीच्या नियंत्रण व नियमनाबरोबरच वाहतूक नियमांबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वाहतूक प्रशिक्षण केंद्र, खेरवाडी, मुंबई येथे प्रशिक्षित करण्यात आले. २००५मध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर ठाणे ग्रामीण, वसई आणि पुणे ग्रामीण येथे नेमणूक झाली.

अधिक माहितीसाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिस अधिकारी व्हायचय?
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!