
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक : बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने दोन दिवसांपूर्वी अटक असून, या प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान अनेक व्हिडीओ, फोटो आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर आला आहे. महिलेने दाखल केलेल्या एफआयआर (FIR) मधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
महिलेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये (FIR) म्हटले आहे की, अशोक खरात हा स्वतःला कृष्णाचा अवतार सांगायचा. ‘मी कृष्णाचा अवतार आहे, तू मागच्या जन्मातील माझी राधा होती, असे तो महिलांना सांगायचा. महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात कानाजवळ पुटपुटायचा, त्यापूर्वी तो पेढा आणि कडवट – खारट चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि लागलीच स्पर्श करायला सुरुवात करायचा. महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली केबिन बाहेर ठेवायचा. महिलांना गुंगी आली की त्यांचं लैंगिक शोषण करायला सुरूवात करायचा, असा कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न होता.’

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
कॅप्टन खरात हा सध्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत आहे. १००हुन अधिक लैंगिक शोषणाचे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती समोर आली आहे. कॅप्टन खरातकडे अनेक राजकीय, कलाकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींचा राबता असायचा तेही समोर आले आहे. अनेक नेतेमंडळींसोबत खरातचे फोटो व्हिडीओ समोर आले आहेत.
नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत शहरातील कॅनडा येथील एका इमारतीमध्ये खरात याच्या कार्यालयात आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. खरात याने फिर्यादी महिलेचा भावनिक, धार्मिक विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थमिश्रित पाणी पाजले. संमोहित अवस्थेत २ पीडिता गेल्यानंतर तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन खरातने वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

