पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सुविधांचा अभाव; नागरिकांची गैरसोय…

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)
पुणे :
पुणे ग्रामीण पोलीस दल अंतर्गत येणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

पुणे ग्रामीण पोलीस कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पिण्याच्या पाण्यासाठी कुलर ठेवण्यात आला आहे. मात्र तो बंद अवस्थेत असल्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांतून येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांची अधिकच गैरसोय होत आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

कार्यालयाच्या आवारात असलेल्या कॅंटीनचीही अवस्था बिकट आहे. कॅंटीनमध्ये केवळ एकच पंखा असून तोही बंद असल्याने उकाड्यात बसणे कठीण होत आहे. याशिवाय कॅंटीनमध्ये चिलटं आणि माशांचा मोठा त्रास असल्यामुळे दोन मिनिटेही बसणे नागरिकांना शक्य होत नाही.

कॅंटीनजवळ असलेल्या वॉश बेसिनमध्येही पाणी नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. ग्रामीण भागातून तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना आधीच अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच कार्यालयात आवश्यक सुविधा नसल्यामुळे त्यांची अधिकच दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर, तक्रार मांडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नेमकी अडचण कोणाकडे मांडायची असा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दरोडेखोरांचे आव्हान स्विकारले अन्…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…

पुणे जिल्ह्यातील पोलिसाचा धक्कादायक Video Viral…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!