
नागपुरचे प्रसिद्ध उद्योजक आणि पत्नीचा इटलीत मृत्यू, मुलं गंभीर…
नागपूर: नागपूरमधील प्रसिद्ध ‘गुलशन प्लाझा’ हॉटेलचे मालक आणि उद्योजक जावेद अख्तर (वय ५७) आणि त्यांची पत्नी नदिरा यांचा गुरुवारी इटलीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. शिवाय, त्यांची मुले आरजू (वय २५), शिफा (वय २१) आणि जाजेल (वय १५) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नागपूरमध्ये शोककळा पसरली आहे.
नागपुरच्या सीताबर्डी येथील ‘गुलशन प्लाझा’ हॉटेलचे मालक जावेद अख्तर हे त्यांच्या कुटुंबीयांसह २२ सप्टेंबर रोजी युरोप सहलीसाठी गेले होते. फ्रान्समधील पर्यटन आटोपून हे कुटुंब इटलीला पोहोचले होते. गुरुवारी सकाळी ९ वाजता पर्यटनासाठी जात असताना, त्यांच्या नऊ आसनी मिनीबसला इटलीतील ग्रोसेटोजवळ भीषण अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की यामध्ये अख्तर पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अख्तर कुटुंबाचे दोन नातेवाईक तातडीने मदतीसाठी इटलीला रवाना झाले आहेत. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत असून, जखमी मुलांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.
भारतीय अब्जाधीश उद्योगपतीसह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू…
पुणे! गौतमी पाटील हिच्या कारला भल्या पहाटे भीषण अपघात…
माणुसकीला काळिमा! अपघातानंतर हतबल पती अश्रू पुसत हात जोडून उभा राहिला अन्…
Video: सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघातात उद्योजकाचा मृत्यू…
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

