नाशिक जिल्ह्यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवतीवर वेगवेगळ्या अत्याचार…

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. निफाड आणि आडगाव पोलिस ठाण्यात पीडितेने सात युवकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आडगाव पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पीडित युवती आणि संशयित यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडित युवतीच्या तक्रारीनुसार निफाड पोलिस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडल्याने या प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलिस करत आहेत.

निफाड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पीडित युवतीने सहा सात युवकांविरोधात अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. ही घटना वेगवेगळ्या ठिकाणीची असल्याने तपास सुरु आहे. निफाड पोलिस ठाण्यातून 5 जण ताब्यात घेण्यात आले आहे. हा सामुहिक अत्याचार नसून वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेली ही घटना असल्याचं समजते. आडगाव पोलिसांनी एकाला अटक केली असून, चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना पीडित तरुणीवर दोन वर्षांच्या कालावधीत विविध ठिकाणी 2 जणांनी अत्याचार केल्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. आडगाव पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.

पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

Video: टॅक्सीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर युवकाने केले हस्तमैथून…

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून उचललं तर तिसरा आरोपी…

आईसह 4 बहिणींच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती उघड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!