पुणे शहरातील कात्रज घाटात गोळीबार; कारण समोर…

पुणे: पुणे शहरातील कात्रज घाटात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. परंतु, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास करून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे अधिक तपास केला असता एकाने कर्जास कंटाळून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 30/12/2024 रोजी रात्री दहाच्या सुमारास कात्रज मार्शल हद्दीत पेट्रोलिंग करताना कात्रज घाटामध्ये दीपक राजू लकड (वय 42) हा जखमी अवस्थेत मिळून आला होता. पोलिसांनी उपचाराकरिता ससून रुग्णालय दाखल केले होते. दोन व्यक्तींनी कात्रज घाटात घेऊन जाऊन त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे घेऊन त्याच्यावर राऊंड फायर केल्याचे समजले. परंतु, सदर घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज तपास करून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे अधिक तपास केला असता असे निष्पन्न झाले की, त्यांनी सदरची घटना स्वतःहून केली आहे. त्यामुळे त्याला विश्वासात घेऊन अधिक तपास करता त्यांनी असे सांगितले की त्याच्यावर कर्ज असल्यामुळे कर्जास कंटाळून त्याने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहोत

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली अन् घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांच्या तपासात एक पिस्तुल देखील सापडले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे! बिअरबारच्या बाहेर अ‍ॅम्बुलन्स पोहचताच केला गोळीबार; कारण पाहा…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…

पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबार…

पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!