पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…

कोल्हापूर : पोलिसांनी जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी आयशर मालकाच्या मित्राकडून 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यामधील एपीआय, पीएसआय आणि कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून दीपक शंकर जाधव (वय 44, सहा. पोलिस निरीक्षक, गांधीनगर पोलिस ठाणे, (सध्या रा. अर्थव ओंकार कॉप्लेक्स बापट कॅग्प कोल्हापूर, मुळ रा. पेठकिनाई, ता. कोरेगांव, जिल्हा सातारा), आबासाहेब तुकाराम शिरगारे, पोलिस उप निरीक्षक (सध्या रा. विठु माऊली अपार्टमेंट निगडेवाडी उचगांव, ता. करवीर जिल्हा कोल्हापूर मु. पो. उमरगा चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव उस्मानाबाद) आणि संतोष बळीराम कांबळे (वय 33 वर्षे, पो. कॉ.ब.नं. 1828, गांधीनगर पोलिस ठाणे, रा. शिरोली हौसिंग सोसायटी, माळवाडी, शिरोली, ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर) यांच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार आणि त्यांचा मित्र जनावरे वाहतुकीचा व्यवसाय असून, तक्रारदारासह त्यांच्या साथीदारावर गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात तक्रारदाराचा आयशर टेम्पो आहे. तक्रारदार जप्त केलेला टेम्पो सोडण्यासाठी आणि कोर्टात म्हणणे मांडण्यासाठी तपास अधिकारी पोलिस उप निरीक्षक शिरगीरे यांना 25 नोव्हेंबर रोजी भेटले होते. यावेळी तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. तसेच त्यांच्या सहकाऱ्याला दिपक जाधव यांनी फोन करून गुन्ह्यात मदत करतो म्हणत 35 हजारांची मागणी केली. यानंतर लाचलूचपतकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केली असता शिरगिरे यांनी तक्रारदाराला फोनवर पोलिस कर्मचारी कांबळेची भेट घेण्यास सांगितले होते. कांबळेची भेट घेतली असता कांबळेने शिरगिरे यांना समक्ष फोन केला. यावेळी शिरगिरेंच्या सांगणेवरून तक्रारदाराकडे पहिल्यांदा 20 हजार आणि तडजोड करून 15 हजारांची मागणी केली. दीपक जाधव यांनी तक्रारदार अटकेत असताना सदर गुन्ह्यात मदतीसाठी पैसे घेतलेची कबुली देत व गुन्ह्यात मदत करतो असे सांगत उर्वरित 35 हजारांची मागणी केली. तसेच गाडी सोडण्यासाठी शिरगिरेंना 10 हजार मागितल्याचे निष्पन्न झाले.

सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलिस उपआयुक्त/पोलिस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे. विजय चौधरी, अपर पोलिस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, पुणे यांचे तसेच वैष्णवी पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. कोल्हापूर मार्गदर्शनानुसार बापू साळुंके, पोलिस निरीक्षक व पथक अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली.

धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…

साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील लाच घेणारे पाच अधिकारी निलंबीत…

लाच घेतल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा व 12 हजार द्रव दंड…

क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!