कुर्ला बेस्ट बस अपघातातील चालकाचा खुलासा; म्हणून घात झाला…

मुंबई: मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात सोमवारी (ता. ९) रात्री एका बेस्ट बसने सात नागरिकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तब्बल 48 जण जखमी झाले आहेत.

बेस्ट बसमुळे हा अपघात झाला त्या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संजय मोरे याच्याकडून बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ती गर्दी शिरली असे सांगितले जात आहे. मात्र, संजय मोरे याने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते का, यासाठी पोलिसांकडून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, या अपघातासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत मानली जात आहे. ती म्हणजे चालक संजय मोरे याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा नसलेला अनुभव.

संजय मोरे हा कोरोना काळापासून बेस्टमध्ये कंत्राटी तत्त्वावर कामाला होता. तो बेस्टच्या लहान आकाराच्या जुन्या बस चालवायचा. अलीकडेच त्याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती. साधारण 1 डिसेंबरपासून तो इलेक्ट्रिक बस चालवायला लागला होता. त्यापूर्वी संजय मोरे याला 10 दिवस ही बस चालवण्याचे ट्रेनिंगही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संजय मोरे हा यापूर्वी बेस्टच्या ताफ्यातील लहान आकाराच्या आणि जुन्या बस चालवायचा. या बसेसमध्ये पॉवर स्टेअरिंग नव्हते. पण, संजय मोरे याला अलीकडे जी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती, त्यामध्ये पॉवर स्टेअरिंग होते. पॉवर स्टेअरिंग असलेली वाहने वळवण्यासाठी फार जोर लावावा लागत नाही. स्टेअरिंग हलक्याने फिरवले तरी वाहन लगेच वळते. मात्र, जुन्या स्टेअरिंगची वाहने चालवणाऱ्या व्यक्तींना पॉवर स्टेअरिंग असलेली वाहने चालवण्यासाठी बऱ्याचदा अवघड जाते. पॉवर स्टेअरिंगचा नेमका अंदाज न आल्यास अपघात होण्याचा धोका वाढतो. असाच काहीसा प्रकार कुर्ला येथील अपघातात घडला असावा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांनी आरोपीचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे. आरोपी संजय मोरेला ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवताना निकष पाळण्यात आले होते का याची चौकशी होणार आहे. बेस्ट प्रशासनाशी बोलून पोलीस पडताळणी करणार आहेत. बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि संबंधित कंत्राटदाराची चौकशी होण्याची शक्यता. याआधी संजय मोरे छोट्या मिनीबस आणि इतर गाड्या चालवत होता पण त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नव्हता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

बेस्टचालक संजय मोरे याला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. त्याने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. मात्र, या चाचणीत संजय मोरे याने मद्यप्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचेही बेस्टकडून सांगण्यात आले आहे.

संजय मोरे हे बस चालक घाटकोपरच्या असल्फा विभागाचा रहिवासी आहे. अनेक वर्षे वाहन चालक म्हणून काम करीत आहेत. लॉकडाऊननंतर बेस्टमध्ये कंत्राटमध्ये ते कामाला लागले. तेव्हा पासून संजय मोरे बेस्टच्या बस चालवतात. ही मोठी इलेक्ट्रीक बस त्यांनी 10 दिवसांपूर्वी चालवयला सुरवात केली होती. त्याची देखील त्यांनी 10 दिवस ट्रेनिंग घेतली होती. संजय मोरे कधीही दारू पिऊन गाडी चालवत नाहीत, बसमध्ये काही तांत्रिक घडले असावे असा अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संजय मोरे हा 1 डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विविध प्रश्न निर्माण होत आहे.

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे…
1. आफरीन अब्दुल सलीम शाह (वय 19)
2. अनम शेख (वय 20)
3. कनिस फातिमा गुलाम कादिर (वय 55)
4. शिवम कश्यप (वय 18)
5. विजय विष्णू गायकवाड (वय 70)
अन्य दोन जणांची नावे समजू शकलेली नाहीत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईतील बेस्ट अपघातातील मृतांचा आकडा वाढला; पाहा मृतांची नावे…

मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू…

मुंबईत वरळी सी लिंकवर 6 वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू…

हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…

बारामतीजवळ मोटार अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू…

IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!