पुणे जिल्ह्यात पतसंस्थेच्या अध्यक्षा महिलेची चाकूने वार करून हत्या…

इंदापूर (पुणे): चाकूने सपासप वार करून महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूरमध्ये घडली आहे. सुनिता दादाराव शेंडे (वय ३३, रा. निमगांव केतकी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुनिता यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ज्ञानेश्वर बबन रासकर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. ज्ञानेश्वर याने सुनिता शेंडे यांची हत्या का केली? याचे कारण मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. 4 तारखेच्या रात्री ज्ञानेश्वरने निमगाव केतकी सराफवाडी रोडवर सुनिता शेंडे यांची हत्या केली आहे. आरोपी ज्ञानेश्वर रासकर हा इंदापूरच्या सुरवडचा रहिवासी आहे.

सुनिता शेंडे या जानाई लक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा होत्या. सुनिता शेंडे यांचे पती दादासाहेब शेंडे हे समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. सुनिता शेंडे यांच्या हत्येमागे पतसंस्थेचा एँगल आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…

पुणे शहरात पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून मारहाण केलेल्या युवकाचा मृत्यू…

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!