
नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या एसयूव्ही कारवर हल्ला…
नागपूर : नागपूरच्या किल्ला परिसरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचत कर्मचाऱ्यांना गाडीतून सुखरुप बाहेर काढले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची मोडतोड करण्यात आली आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरातील बुथ क्रमांक 268 च्या जवळ बुधवारी (ता. २०) संध्याकाळी 7 ते 7.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 वरून ईव्हीएम घेऊन जाणारी तवेरा एसयुव्ही मतदान केंद्रातून बाहेर निघाली, तेव्हा त्या गाडीवर हल्ला करण्यात आला. नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत दगड आणि लोखंडी रॉड्सने हल्ला करत evm घेऊन जाणाऱ्या तवेरा कारची मोडतोड करण्यात आली होती.
पोलिसांनी ईव्हीएम तसेच तवेरा एसयुव्हीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. मोडतोड करण्यात आलेली तवेरा एसयुव्ही कार पोलिसांनी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये आणली. त्यानंतर ईव्हीएम आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचवले आहे. या घटनेनंतर कोतवाली पोलिस स्टेशन समोर मोठ्या संख्येने भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते गोळा झाले होते. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिस स्टेशनकडे धाव घेत सर्व कार्यकर्त्यांची गर्दी कमी केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
EVM मशीन फोडल्या प्रकरणी 40 जणांवर गु्न्हे दाखल…
कराळे मास्तरांना भर रस्त्यात कॉलर पकडून मारहाण…
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना धमकी…
पुणे शहरात शरद पवार गटाचा नेत्यावर भरदुपारी हल्ला…
विरार प्रकरण! भाजपचे विनोद तावडे, राजन नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांची कारवाई…

