
विरार प्रकरण! भाजपचे विनोद तावडे, राजन नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि विरारचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर नालासोपारा मतदारसंघात पाच कोटी रुपये वाटप केल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यानंतर विरारमधील एका हॉटेलमध्ये मोठा राडा झाला आहे.
विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये धडकले. त्यांनी थेट विनोद तावडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तावडे आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण विनोद तावडे होते त्याच्या शेजारील टेबलवर बविआ कार्यकर्त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग लागली. त्या पाकिटातून नोटांची बंडलं बाहेर आल्यानंतर तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना प्रश्न विचारत थेट 4 तास हॉटेलमध्येच रोखून धरले होते.
वसईच्या तुळींज विवांता हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते तेथे पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाची टीम तिथे पोचली. त्या ठिकाणी एसएसटी टीमला नऊ लाख 93 हजार पाचशे रुपये सापडले आहेत. त्याचबरोबर इतर कागदपत्रेही सापडले आहेत. त्या पद्धतीने कार्यवाही सुरू असून पोलिसांनीसुद्धा तशी तक्रार दाखल केली आहे. या हॉटेलची पूर्ण तपासणी करून त्याबाबतीत पूर्ण कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे एक तासाच्या आत सदर बाबतीत गुन्हाही दाखल करण्यात येईल, असे मत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, विरारमधील हॉटेल विवांतमध्ये बविआचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांनी कार्यकर्ते, पोलिसांसह हॉटेलच्या काही रुमची झडती घेतली. त्याच वेळी एका रुममध्ये 7 महिला आढळून आल्याने खळबळ उडाली. या महिलांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण सगळे एका ग्रुपने आलो असल्याचे सांगितले. आपण एका व्यक्तीसोबत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व महिला या विविध वयोगटातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांची कारवाई…
बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई याला कॅलिफोर्नियामधून अटक
भाजपच्या मंत्र्याला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता अटकेत…
भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…
भाजप नेत्याची पोलिसांना धमकी, व्हिडिओ व्हायरल…

