Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओला लाइक करण्यास सांगून पैसे लुबाडण्याचा सध्या नवा फंडा समोर आला आहे. एका दुकानदाराला त्याचा मोठा फटका बसला आहे.

एका दुकानदाराला युट्युबवर काही छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी 123 रुपये आणि 492 रुपये मिळाले. त्यामुळे तो खूश झाला. मग त्याला एका टेलिग्राम ग्रूपवर अ‍ॅड करण्यात आले. तिथे त्याला पैसे जमा केले तर त्यावर कमिशन दिले जाईल असे सांगितले. त्यामुळे त्याने 56.7 लाख रुपये जमा केले. त्यासाठी त्याने लोकांकडून पैसे उसने घेतले. त्यानंतर घोटाळेबाजांनी त्याच्याशी कोणताच संपर्क ठेवला नाही. त्यामुळे आपण फसल्याचे त्या दुकानदाराला लक्षात आले.

दरम्यान, अशा प्रकारचे अनेक घोटाळे सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ लागले आहेत. ‘डिजिटल अरेस्ट स्कॅम’ हाही त्यापैकीच एक आहे. यात घोटाळा केला असा सांगून ग्राहकांनाच धमकावले जाते, पोलिस अटक करतील अशी भीती दाखवली जाते. त्यानंतर शेवटी त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून रक्कम काढली जाते. अशा घोटाळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…

सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!